पाण्यात,अवकाशात अन् जमीनीवर देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 01:07 PM2024-08-15T13:07:35+5:302024-08-15T13:08:00+5:30

प्रवीण यांनी पूर व नियंत्रण तसेच शोध व बचावपथकांमध्ये काम केलेेले असून त्यादरम्यान आतापर्यंत ७८ मृतदेह पूराच्या पाण्याच्या बाहेर काढले आणि एकूण ५५ लोकांचे प्राण वाचविले आहेत.

Celebrating Independence Day in water, space and land too | पाण्यात,अवकाशात अन् जमीनीवर देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्सव

पाण्यात,अवकाशात अन् जमीनीवर देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्सव

मनीष तसरे -

अमरावती:  आयुक्तलयातील पोलीस अंमलदार प्रविण आखरे यांनी स्वातत्र्य दिनाच्या दिवशी पोलीस जलतरण केंद्रात अकरा फूट पाण्याखाली तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा उत्साह साजरा केला. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त कल्पना बोरकर,सागर पाटील, व इतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रवीण आखरे हे जलतरण केंद्रात पोलिस अंमलदार म्हणून काम पाहत आहे.त्यांनी या पाण्यावर तरंगत व पाण्याच्या आत राहून योगासने करून 'इंडीया बुक ऑफ रेकाॅर्ड' व 'एशिया बुक ऑफ रेकाॅर्ड' आपल्या नावे केला आहे.त्यांच्या या कामगीरीमूळे अमरावती शहर पोलिस विभागाच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला असून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची शान वाढली आहे.

प्रवीण यांनी पूर व नियंत्रण तसेच शोध व बचावपथकांमध्ये काम केलेेले असून त्यादरम्यान आतापर्यंत ७८ मृतदेह पूराच्या पाण्याच्या बाहेर काढले आणि एकूण ५५ लोकांचे प्राण वाचविले आहेत.

Web Title: Celebrating Independence Day in water, space and land too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.