रामनवमी उत्साहात साजरी

By Admin | Published: April 16, 2016 12:13 AM2016-04-16T00:13:07+5:302016-04-16T00:13:07+5:30

शहरासह बडनेरा येथे रामनवमी उत्सव थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

Celebrating in Ram Navami | रामनवमी उत्साहात साजरी

रामनवमी उत्साहात साजरी

googlenewsNext

भाविकांची मांदियाळी : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अमरावती/बडनेरा : शहरासह बडनेरा येथे रामनवमी उत्सव थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले.
शहरातील अंबापेठ जवळील श्रीराम मंदिर ट्रस्टच्यावतीने प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्सवात शुक्रवारी साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता दरम्यान मोठ्या पाळण्यात श्रीरामाची प्रतिमा ठेवून हजारो भक्तांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव साजरा झाला.
शुक्रवारी सकाळी प्रभू श्रीरामाचा अभिषेक करण्यात आला. पांडूरंग वजूरकर यांनी ग्रंथवाचन केले. तर यावेळी विनोद कोलवाडकर यांचे कीर्तन झाले. यानंतर आरती व श्रीरामाच्या नावाचा जयघोष व गजर करण्यात आला. प्रसादाचेही वाटप करण्यात आले. सकाळपासूनच अंबानगरीतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय आळशी, प्रकाश देशपांडे, शैलेश जोग, मोहन अग्रवाल, प्रज्ञा देशपांडे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.
अंबापेठेतील श्रीराम मंदिर हे ११८ वर्षांपूर्वी श्रीरंग आळशी यांनी स्थापन केले. उत्तर दिशेला प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतेची सुंदर व देखणी मुर्ती आहे. समोर हनुमंताची मूर्ती आहे. संपूर्ण मंदिर सागवानी धाटणीचे आहे.
बडनेरा शहरातील विविध ठिकाणच्या श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. रामनामाच्या गजराने शहर दुमदुमून गेले होते. जुन्या वस्तीतील गोडबोले यांच्या राम मंदिरात हभप रमेश गोडबोले यांचे राम जन्माचे कीर्तन झाले. तर वाकेकर यांच्या श्रीराम मंदिरात हभप महादेवबुवा बडनेरकरांचे कीर्तन पार पडले. तसेच नव्या वस्तीत देखील यवतमाळ मार्गावरच्या राम मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. राम जन्मोत्सवाच्या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रत्येक राम मंदिरात राम जन्माचा पाळणा गीते म्हणण्यात आली. रामनामाचा जयघोष आरती, भजने म्हणण्यात आली.
प्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्वच मंदिरामध्ये भाविकभक्तांची मोठी गर्दी उसळली होती. रामनामाच्या गजराने शहर दुमदुमून गेले होते. तसेच शोभायात्रा काढण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Celebrating in Ram Navami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.