आयटीआयव्दारे २७ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:18 AM2021-09-17T04:18:05+5:302021-09-17T04:18:05+5:30

अमरावती : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक, तसेच दोन वर्षाच्या विविध २७ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिल्प कारागीर प्रशिक्षण ...

Central admission process for 27 vocational courses through ITI | आयटीआयव्दारे २७ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

आयटीआयव्दारे २७ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

Next

अमरावती : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक, तसेच दोन वर्षाच्या विविध २७ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्तीर्ण उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगार, शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत रोजगाराची संधी व उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध आहे. कोरोना कालावधीतसुध्दा या संस्थेतील उत्तीर्ण उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रवेश घेऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य मंगला देशमुख यांनी केले.

बॉक्स

प्रवेशाची पहिली फेरी ७ ते १२ सप्टेंबर

दुसरी फेरी -१६ ते २० सप्टेंबर

तिसरी फेरी -२५ ते २८ सप्टेंबर

चौथी फेरी -४ ते ७ ऑक्टोबर

संस्थास्तरीय समुपदेशन फेरी-१४ ते १७ ऑक्टोंबर

Web Title: Central admission process for 27 vocational courses through ITI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.