धामणगावात केंद्र शासनाचा आणणार निधी

By admin | Published: January 15, 2016 12:47 AM2016-01-15T00:47:09+5:302016-01-15T00:47:09+5:30

विद्यानगरी असलेल्या या शहराचा तीन टप्प्यांत विकास करणार असून या शहरात सोलर पॉवर प्लॅन, लॉजिस्टिक पार्क, सार्वजनिक बगीचा, ...

Central Government funding funding | धामणगावात केंद्र शासनाचा आणणार निधी

धामणगावात केंद्र शासनाचा आणणार निधी

Next

पहिल्या टप्प्यात सहा कोटी प्राप्त : राज्यमंत्र्यांनी स्वीकारले पालकत्व
धामणगाव रेल्वे : विद्यानगरी असलेल्या या शहराचा तीन टप्प्यांत विकास करणार असून या शहरात सोलर पॉवर प्लॅन, लॉजिस्टिक पार्क, सार्वजनिक बगीचा, चौकाचे सौंदर्यीकरण, व्यापारी संकुल, स्विमिंग पूल, आठवडी बाजाराचे विस्तारीकरण यासह विविध कामे तीन टप्प्यांत करण्यासाठी केंद्र शासनाचा निधी आणणार असल्याची ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली़
धामणगाव शहरातील विविध शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांच्या भेटी घेण्यासाठी ते बुधवारी आले होते. पालकत्व स्वीकारलेल्या नगरपरिषदेला त्यांनी भेट दिली़ यावेळी भाजप नेते अरूण अडसड, नगराध्यक्ष अर्चना राऊत, उपाध्यक्ष हेमकरण कांकरीया, पं़स़सभापती गणेश राजनकर, प़ंस़सदस्य सचिन पाटील, बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, मुख्याधिकारी वाहुरवाघ, गटशिक्षणाधिकारी सुनंदा बंड यांची उपस्थिती होती़
शहर विस्तारीकरणाकरिता ३५ वसाहती आणि तीन गावांचा परिसर जोडण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे़ पहिल्या टप्प्यात एक मेगावॅट वीजनिर्मितीचा सोलर पॉवर प्लॅन तयार केली जाईल. ही वीज विद्युत मंडळाला देऊन शहराला प्रकाशमय करण्यात येणार आहे़ विजेचे केबल भुयारी मार्गाने टाकण्यात येणार आहे़ महिलांची सर्वाधिक गर्दीचे बुधवार बाजाराचे स्थानांतरण धवणेवाडी येथील ७ हजार ८८० स्क्वे़मी़मध्ये केला जाणार आहे़ येथे बाजार ओटे, वाहनतळाची निर्मिती ९ कोटी ५७ लक्ष रूपयांत केली जाईल़ शास्त्री चौक येथील प्राथमिक शाळा स्थांनातरित करून नव्याने शैक्षणिक संकुल २ कोटी २५ लाख रूपयांत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पाटील म्हणाले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Central Government funding funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.