मध्य रेल्वे भुसावळ विभागाची हरित उपक्रमाकडे झेप; ऑगस्टमध्ये २२५ किलोवॅट क्षमतेचे सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित
By गणेश वासनिक | Published: September 17, 2023 12:11 PM2023-09-17T12:11:12+5:302023-09-17T12:11:24+5:30
बडनेरा, मुर्तिजापूर,नांदुरा, जळगाव रेल्वे स्थानकाचा समावेश
अमरावती : मध्य रेल्वे भुसावाळ विभागाने पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये महत्वाच्या विविध प्रमुख स्थानकांवर सौर रूफटॉप प्रकल्प कार्यान्वित करून स्थापित केले आहे. त्याच्या झोनमध्ये एकूण ७.९१४ मेगावॅट क्षमतेच्या अक्षय ऊर्जा वापरण्याच्या स्त्रोताची स्थापना ही मध्य रेल्वेच्या समर्पणाचा पुरावा आहे.
मध्य रेल्वेने त्याच्या नेटवर्कमधील ८१ ठिकाणी अतिरिक्त १ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी कंत्राटे दिली आहेत. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम शाश्वत ऊर्जा उपायांसाठी रेल्वेची वचनबद्धता दर्शवत आहे. या अनुषंगाने नागपूर विभागातील अजनी येथील नवीन इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये १ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी निविदा देण्यात आली आहे. याशिवाय, पुणे विभागात पॉवर पर्चेस अग्रीमेंट (पीपीए) मोडद्वारे १ मेगावॅटचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने नेटवर्कमधील विविध मोक्याच्या ठिकाणी ४ मेगावॅट क्षमतेच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा विकास सुरू केला आहे, ज्याला पीपीए मोडद्वारे पॅनेल केलेले आणि ऑपरेट केले आहे. हा प्रकल्प २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. संयुक्त प्रयत्नांमुळे देशाच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये सकारात्मक योगदान देताना त्याचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचे समर्पण दिसून येते. नवनवीन प्रयोगांचा अवलंब करून, स्वत:च्या हाताने नवीन मानके प्रस्थापित करण्यात मध्य रेल्वे पहिल्या क्रमांकावर राहिली आहे.
रेल्वे स्थानकनिहाय उभारलेले सौर उर्जा प्रकल्प
भुसावळ विभागात नांदुरा - १० किलोवॅट, बडनेरा - २० किलोवॅट, गायगाव - १५ किलोवॅट, धुळे १५ किलोवॅट, मूर्तिजापूर - २० किलोवॅट, मांडवा - १० किलोवॅट, बुरहानपूर - ३० किलोवॅट, जळगाव - ३० किलोवॅट तसेच पुणे विभागात एकूण ६५ किलोवॅट स्थापित करण्यात आले आहे. यात पल्सी रेल्वे स्थानक १५ किलोवॅट, किर्लोस्करवाडी – २