मध्य रेल्वेने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत ४०८ मुलांची केली सुटका

By गणेश वासनिक | Published: July 21, 2023 12:30 PM2023-07-21T12:30:57+5:302023-07-21T12:32:00+5:30

रेल्वे सुरक्षा दलाची कार्यवाही, एप्रिल ते जून २०२३ पर्यंत विशेष मोहीम, पुणे विभागाने सर्वाधिक १३८ मुलांची सुटका केली

Central Railway rescued 408 children under 'Operation Nanhe Farishte' | मध्य रेल्वेने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत ४०८ मुलांची केली सुटका

मध्य रेल्वेने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत ४०८ मुलांची केली सुटका

googlenewsNext

अमरावती : रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने एप्रिल ते जून २०२३ या तीन महिन्यात ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत ४०८ मुलांची सुटका करुन त्यांना  वाचवण्याची जबाबदारी यशस्वीपणे हाताळली आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) सरकारच्या समन्वयाने ४०८ मुलांची सुटका केली आहे. एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी म्हणजेच ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत यामध्ये ३१८ मुले आणि ९० मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.

काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानाना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात. त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करीत आहे.

मध्य रेल्वेवर एप्रिल ते जून २०२३ मध्ये सुटलेल्या मुलांचे विभागनिहाय तपशील

 - मुंबई विभागाने ९२ मुलांची सुटका केली, त्यात ५८ मुले आणि ३४ मुलींचा समावेश आहे. 
- भुसावळ विभागाने ९४ मुले आणि २५ मुलींचा समावेश असलेल्या ११९ मुलांची सुटका केली.
 - पुणे विभागाने १३८ मुलांची सुटका केली असून त्यात सर्व १३८ मुलांचा समावेश आहे
 - नागपूर विभागाने ४० मुलांची सुटका केली असून त्यात २१ मुले आणि १९ मुलींचा समावेश आहे.
 - सोलापूर विभागाने १९ मुलांची सुटका केली असून यामध्ये ७ मुले आणि १२ मुलींचा समावेश आहे.

Web Title: Central Railway rescued 408 children under 'Operation Nanhe Farishte'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.