मध्य रेल्वेची कामे मिशनमोडवर; मल्टिट्रॅकिंग, सिग्नलिंग कामांना प्राधान्य; ट्रेनचा वेग ताशी १३० किमीपर्यंत वाढविला
By गणेश वासनिक | Published: December 26, 2023 07:22 PM2023-12-26T19:22:07+5:302023-12-26T19:22:29+5:30
यामध्ये मल्टिट्रॅकिंग, ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. परिणामी, रेल्वे गाड्यांचा प्रति वेग ताशी १३० किमीपर्यंत वाढवित आला आहे.
अमरावती : मध्य रेल्वे विभागाने गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने विविध विभागांमध्ये पायाभूत प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी सुविधांची कामे केली जात आहेत. यामध्ये मल्टिट्रॅकिंग, ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. परिणामी, रेल्वे गाड्यांचा प्रति वेग ताशी १३० किमीपर्यंत वाढवित आला आहे.
धावत्या गाड्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम प्रवास सोय मिळावी, यासाठी ट्रॅकचा उत्तम दर्जा राखला जात आहे. ट्रॅकचे आयुर्मान होताच ते बदलण्याचे कामही युद्धस्तरावर हाती घेतले जात आहे. मध्य रेल्वे ट्रॅकची देखभाल आणि ट्रॅक नूतनीकरणासाठी समानुपातिक लक्ष्यापेक्षा खूप पुढे आहे. म्हणूनच २०२३-२४ साठी सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्याची योजना आखली आहे. याकामांमुळे मध्य रेल्वे विभागाने प्रति ताशी १३० किमी वेगाने गाड्या चालवता येत आहेत.
विभाग - अंतर
पुणे – दौंड विभाग ७५.५९ किमी
इटारसी-नागपूर-वर्धा- बल्हारशाह विभाग ५०९.०५ किमी
वर्धा-बडनेरा विभाग ९५.४४ कि.मी
इगतपुरी-नाशिक-भुसावळ-अकोला-बडनेरा विभाग ५२६.६५ कि.मी.
खालील विभागांत ताशी १३० किमी वेगाने धावता गाड्या
दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी विभाग : ३३७.४४ किमी. याशिवाय १७ किमीच्या पुणतांबा-शिर्डी विभागावर ७५ किमी प्रतितास वरून ११० किमी प्रतितास आणि ९ किमीच्या बडनेरा-अमरावती सेक्शनवर ६५ किमी ताशीवरून ९० किमी प्रतितास वेग वाढला आहे.