मध्य रेल्वेच्या ‘झीरो स्क्रॅप’ मोहिमेला वेग, १३२.४७ कोटींचा लाभ
By गणेश वासनिक | Published: August 18, 2023 03:42 PM2023-08-18T15:42:32+5:302023-08-18T15:43:11+5:30
२०.४१ टक्क्यांची लक्षणीय वाढ, रेल्वे बोर्डाकडून ३०० कोटींच्या उद्दिष्टपूर्तीचे वचनबद्ध
अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने ‘झीरो स्क्रॅप’ मोहीम हाती घेतली असून, गत चार महिन्यात भंगारातून १३२.४७ कोटींचा लाभ मिळविला आहे. कालबाह्य साहित्य, मशीनचा वापर बंद आणि जुन्या वस्तू भंगारात ई-निविदाद्वारे विक्री करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर आणि मुंबई विभागात ‘झीरो स्क्रॅप’ मोहिमेला वेग आला आहे.
मध्य रेल्वेने झीरो स्क्रॅप मिशनला प्राधान्य देत जुन्या लोको, डिझेल सरप्लस लोको, नॉन-ऑपरेशनल रेल्वे लाइन्स आणि वृद्ध किंवा अपघातग्रस्त लोको, कोच यासह विविध प्रकारच्या भंगारांची ओळख आणि विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या दृढनिश्चयी प्रयत्नाचे प्रभावी परिणामदेखील मिळाले आहेत. मध्य रेल्वेने १३२.४७ कोटींची भंगार विक्री साध्य केली आहे. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत रेल्वे बोर्डाच्या ऑगस्ट २०२३ पर्यंतच्या समानुपातिक उद्दिष्टाच्या तुलनेत २०.४१ टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवली आहे.
अशी झाली विभागनिहाय भंगार विक्रीतून कमाई
- मुंबई विभाग २४.३६ कोटी
- भुसावळ मंडळ १७.९९ कोटी
- सोलापूर परिमंडळ ८.०९ कोटी
- नागपूर विभाग ९.६६ कोटी
- पुणे मंडळ १४.३३ कोटी
- माटुंगा डेपो २३.५६ कोटी
-इलेक्ट्रिक लोको शेड डेपो, भुसावळ १३.५० कोटी
‘झीरो स्क्रॅप’ मिशनच्या कक्षेत सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त दर्जा प्राप्त करण्यासोबतच २०२३-२०२४ या वर्षासाठी रेल्वे बोर्डाचे ३०० कोटींचे उद्दिष्ट पार करण्याच्या वचनबद्धतेवर मध्य रेल्वे अथकपणे काम करत आहे.
- राम पॉल बारपग्गा, जनसंपर्क अधिकारी, मुंब