मध्य रेल्वेची लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करण्याची मोहीम
By गणेश वासनिक | Published: October 27, 2023 04:05 PM2023-10-27T16:05:06+5:302023-10-27T16:05:56+5:30
रेल्वे मार्गावर लेव्हल क्रॉसिंग गेट असल्यामुळे बरेचदा अपघात झाले आहेत.
अमरावती : मध्य रेल्वे भुसावळ विभागाने लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अपघात विरहित प्रवास व्हावा, यासाठी यंदा एप्रिल ते आतापर्यंत १९ लेव्हल क्रॉसिंग गेट्स बंद करण्यात आले आहे. त्याजागी भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे.
रेल्वे मार्गावर लेव्हल क्रॉसिंग गेट असल्यामुळे बरेचदा अपघात झाले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे भुसावळ विभागाने असे गेट बंद करून त्याऐवजी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. आरसीसी लेव्हल क्रॉसिंग गेट काढून टाकताना दाेन्ही ब्लॉकमधील सर्व चार रेल्वे लाइनवर गर्डर टाकण्यात आले आहेत. अशीच प्रक्रिया पूर्ण विभागात राबवून लेव्हल क्रॉसिंग गेट लवकरच बंद करण्यात येणार आहे. यंदा २१ ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे. तर नव्याने ३० रोड ओव्हर ब्रिज मंजूर झाले असून, १४ अंडर पास पूर्ण करण्यात आले आहे. एकूण ९० रोड अंडर पास (आरयूबी) मंजूर झाले आहेत.
यंदा लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करण्यासाठी ७१४.३५ कोटी खर्चाची तरतूद आहे. आतापर्यंत ३१६.८७ कोटी खर्च झाला असून, गाड्यांची सुरक्षा आणि वक्तशिरपणा सुधारण्यासाठी सर्व एलसी गेट्स बंद करण्यात येणार आहेत.
- जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे भुसावळ.