केंद्रीय ग्रामविकास पथक तिवसा तालुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:18 AM2021-08-18T04:18:46+5:302021-08-18T04:18:46+5:30
तिवसा : केंद्र सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीला निधी देण्यात येतो. त्या निधीचा वापर कशाप्रकारे केला ...
तिवसा : केंद्र सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीला निधी देण्यात येतो. त्या निधीचा वापर कशाप्रकारे केला जातो, केंद्रीय निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्राच्या ग्रामविकास विभागाचे दोन पथक अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या पथकाच्या माध्यमातून अनेक गावांना भेटी दिल्या जात असून यामध्ये केंद्र सरकारच्या अनेक खासदारांचा व वरिष्ठ अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. मंगळवारी या पथकाद्वारे तिवसा तालुक्यातील भिवापूर, सातरगाव, शेंदोळा खुर्द, कुऱ्हा आदी गावांची पाहणी करण्यात आली. तसेच तेथील कामकाजाचा आढावा घेऊन स्थानिक गावकऱ्यांशी या समितीने संवाद साधला. दिल्लीहून आलेली ही समिती संपूर्ण परिस्थितीचा लेखाजोखा तयार करून केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयालासुद्धा सादर करणार आहे. या पथकात खासदार विजयकुमार दुबे, अजय प्रतापसिंग, श्याम शिंग यादव, नरेंनभाई रतवा यांचा समावेश आहे. यावेळी तहसीलदार वैभव फरतारे यांनी या पथकाला तालुक्याची माहिती दिली.