संभाव्य पाणीटंचाई आराखड्यासाठी सीईओंनी दिला टाइमटेबल

By जितेंद्र दखने | Published: September 18, 2023 08:01 PM2023-09-18T20:01:19+5:302023-09-18T20:01:31+5:30

जिल्हा परिषद : १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबरपर्यंत ठरणार नियोजन

CEO gives timetable for potential water shortage plan amravati | संभाव्य पाणीटंचाई आराखड्यासाठी सीईओंनी दिला टाइमटेबल

संभाव्य पाणीटंचाई आराखड्यासाठी सीईओंनी दिला टाइमटेबल

googlenewsNext

अमरावती : संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा सन २०२३-२४ करिता मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत अधिनस्त यंत्रणेला १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधी करावयाच्या नियोजनाकरिता कालबद्ध कार्यक्रम आखून दिलेला आहे.

यानुसारच संबंधित यंत्रणेने कारवाई करावी, अशा सूचना देखील सीईओंच्या आदेशात दिल्या आहेत. जिल्ह्यामध्ये सन २०२३-२४ या वर्षातील पर्जन्यमानाची स्थिती पाहता येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्याचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जाणार आहे. पाणीटंचाई आराखडा तयार करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन व त्याप्रमाणेच पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करताना अंमबजावणी करावी, अशा सूचना या आदेशात सीईओंनी दिलेल्या आहेत.

असा आहे सीईओंनी दिलेला कालबद्ध कार्यक्रम
वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने संभाव्य निर्माण होण्याची शक्यता असणाऱ्या गावे, वाड्या-वस्त्या घोषित करणे १८ सप्टेंबर, टंचाईसदृश गावांची यादी तहसील कार्यालयाकडे सादर करणे, तहसीलदार यांनी २२ सप्टेंबर, टंचाईसदृश गावे घोषित करणे ३० सप्टेंबर, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा डीव्हीबीटीटी फास्ट एक्सलंट सीटमध्ये तयार करणे ६ ऑक़्टोबर, संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा सॉफ्ट व हार्ड कॉपीसह ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करणे १२ ऑक्टोबर आणि जिल्ह्याचा एकत्रित पाणीटंचाई आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यासाठी झेडपी पाणीपुरवठा विभागाला १६ ऑक़्टोेबरपर्यंत डेडलाइन देण्यात आली आहे.

सन २०२३-२४ या वर्षातील संभाव्य पाणीटंचाई आराखडा हा विहित मुदतीत पूर्ण करावा, याकरिता शासनाचे मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कारवाई करावी, यासाठी १८ सप्टेंबर ते १६ आक्टोेबरपर्यंत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून संबंधित यंत्रणेला दिलेला आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी यानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
अविश्यांत पंडा,
मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: CEO gives timetable for potential water shortage plan amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.