सीईओंनी घेतला टंचाईग्रस्त गावांचा आढावा

By admin | Published: April 25, 2016 12:13 AM2016-04-25T00:13:48+5:302016-04-25T00:13:48+5:30

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ११ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

CEOs reviewed scarcity-hit villages | सीईओंनी घेतला टंचाईग्रस्त गावांचा आढावा

सीईओंनी घेतला टंचाईग्रस्त गावांचा आढावा

Next

पाणीप्रश्न पेटला : चिखलदरा तालुक्यातील ११ गावांत सीईआेंच्या भेटी
अमरावती : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ११ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या आदिवासीबहूल गावांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी २० आणि २१ एप्रिल रोजी प्रत्यक्ष भेटी देऊन पाणी टंचाईचा आढावा घेतला. याशिवाय या गावातील नागरिकांशी चर्चा करून ठोस उपाययोजनासाठी नियोजन करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. यासोबतच पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या आदिवासी नागरिकांना या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. दरवर्षी मेळाघाटातील काही गावांत उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत. त्यामुळे या पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील नवलगाव, कालापाणी, ढोणी फाटा, कुलंगणा, भांदरी, तारूबांदा, ढोमण बर्डा, आवागड, खडीमल व इतर दोन गावांना टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
चिखलदरा तालुक्यातील ११ गावांना ८ टॅकरने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे या गावांतील पाणी टंचाईची समस्या मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी प्रत्यक्ष या गावांचा दोन दिवस दौरा करून जाणून घेतली. तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांशी चर्चा केली . यावेळी त्याच्या समवेत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के.टी. उमाळकर, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पी.पी. पोटफोडे यांना आवश्यक सूचना दिल्यात. याशिवाय या गावांमध्ये जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजना आणि सिंचन विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: CEOs reviewed scarcity-hit villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.