सीईओंनी घेतली विभागाची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:12 AM2021-05-01T04:12:30+5:302021-05-01T04:12:30+5:30
जिल्हा परिषद; विविध विभागाची पाहणी अमरावती : जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी शुक्रवारी मिनीमंत्रालयातील सर्वच विभागाची अचानक ...
जिल्हा परिषद; विविध विभागाची पाहणी
अमरावती : जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी शुक्रवारी मिनीमंत्रालयातील सर्वच विभागाची अचानक झाडाझडती घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक विभागातील कामकाजाची तसेच अधिकारी, कर्मचारी यांच्या बैठक व्यवस्थेसह अन्य माहितीही सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओंसह संबंधित खातेप्रमुखांकडून जाणून घेतली.
सीईओंनी दुपारी १२.३० वाजता दरम्यान जिल्हा परिषद मुख्यालयातील सामान्य प्रशासन विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, सिंचन, समाजकल्याण, वित्त विभाग, पंचायत विभाग, भांडार विभाग, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, बांधकाम, आरोग्य, एनआरएचएम, औषध भांडार, रोजगार हमी योजना विभाग आदी विभागात प्रत्यक्ष संबंधित विभागातील प्रशासकीय कामकाज, कोरोनामुळे कार्यालयातील उपस्थिती, बैठक व्यवस्था, इमारतीची पाहणी केली. यावेळी सीईओंनी प्रत्येक विभागाने प्रशासकीय कामकाज करताना कार्यालयात स्वच्छता राखण्याच्या सूचना दिल्यात. यासोबतच विभागात किती अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. उपस्थित किती आहेत. गैरहजर असलेले अधिकारी व कर्मचारी का हजर नाहीत. कोण दौऱ्यावर गेलेत याचीही माहिती उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली. या भेटी दरम्यान सीईओसोबत सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, रोहयोचे प्रवीण सिनारे आदी उपस्थित होते. यावेळी डेप्युटी सीईओ टेकाळे यांनी प्रत्येक विभागाची माहिती दिली व तेथील अडचणीही सीईओ समोर अवगत केल्यात.