‘चाणक्य, किशन’वर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 10:46 PM2017-09-10T22:46:03+5:302017-09-10T22:46:34+5:30

पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शनिवारच्या नाईट राऊन्डदरम्यान नांदगाव पेठ हद्दीतील हॉटेल चाणक्य व किशन ढाब्याची झडती घेतली.

'Chadakya, Kishan', the forage | ‘चाणक्य, किशन’वर धाड

‘चाणक्य, किशन’वर धाड

Next
ठळक मुद्देमालकासह दहा जणांविरुद्ध गुन्हा : पोलीस आयुक्तांचा नाईट राऊन्ड

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शनिवारच्या नाईट राऊन्डदरम्यान नांदगाव पेठ हद्दीतील हॉटेल चाणक्य व किशन ढाब्याची झडती घेतली. दरम्यान पोलिसांना त्या ठिकाणी दारू पिताना काही नागरिक आढळून आले. पोलिसांनी हॉटेल चाणक्यचे मालक नितीन हिवसेंसह चार जण व किशन ढाब्यावरील पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदविले.
पोलीस आयुक्तांच्या नाईड गस्तीमुळे अवैध दारू विक्री करणारे व मद्यपींचे धाबे दणाणले आहेत. सीपींनी सलग आठ दिवस शहरातील विविध परिसरात नाईट राऊन्ड घेऊन अवैध दारू व्यावसायिक, गुन्हेगार व मद्यपींवर लक्ष केंद्रित केले. अनेकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत झाली. शनिवारी सीपींनी शहरातील नांदगाव पेठ हद्दीत अचानक नाईट राऊन्ड घेतला. त्यामध्ये हॉटेल गौरी ईनसह चाणक्य व किशन ढाब्याची झडती घेतली. त्यावेळी हॉटेल चाणक्यमध्ये देवेंद्र भाऊराव गोरडे, विजय वासुदेव खेरडे, गोपाल नामदेव जावरकर (सर्व राहणार हिवरखेड) व चेनत अशोक कराळे (रा.अर्जुननगर) हे इसम दारू पिताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याजवळील दारू जप्त करून हॉटेल मालक नितीन केशवराव हिवसेंचा शोध घेतला असता ते तेथून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच सीपींनी पुढे मोर्चा वळवीत नांदगाव पेठ महामार्गावरील हॉटेल किशन ढाब्यावर धाड टाकली. दरम्यान त्याठिकाणी अक्षय रमेश तांगडे, मारोती भीमराव ससाने, रमेश रामराव तांगडे, राजू शामसुंदर पंडित हे इसम दारू विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याजवळील दारु जप्त करून राजु हरिभाऊ चाटेचा शोध घेतला असता ते पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली, तर दोन घटनास्थळावरून पसार झाले आहे.

Web Title: 'Chadakya, Kishan', the forage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.