बच्चू कडूंनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर
By admin | Published: April 11, 2017 12:26 AM2017-04-11T00:26:53+5:302017-04-11T00:26:53+5:30
शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन व पुनर्वसनाच्या प्रश्नावर जाब विचारीत आ.बच्चू कडू यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
आढावा बैठक : प्रकल्पग्रस्तांना त्वरित वाढीव मोबदला द्या
अमरावती : शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन व पुनर्वसनाच्या प्रश्नावर जाब विचारीत आ.बच्चू कडू यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
जलसंपदा विभागाच्यावतीने झालेल्या अनेक प्रकल्पांचे पुनर्वसन रखडले. यासंदर्भाचे वृत्त "लोकमत"ने लोकदरबारात मांडले होते. याची दखल घेऊन आ.बच्चू कडू यांनी जलसंपदा, भूसंपादन पुनर्वसन, जीवन प्राधिकरण व महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी घेतली.
अचलपूर मतदारसंघात होत असलेल्या पेढी प्रकल्पासाठी हातुर्णा, गोपगव्हाण कुंड सर्जापूर येथील, काही ठिकाणी पुनर्वसन करावे लागणार आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार नाही, तो पर्यंत अधिकाऱ्यांनी त्यांच्या जमिनीला हात लावू नये असेही त्यांनी अधिकारयांना सांगितले. या बैठकीसाठी हातुर्णा व बोरगाव दोरी येथील शेतकरी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.
या योजनेत पाणीटंचईग्रस्त १५ गावे नव्याने समाविष्ट करण्यात यावे अशा सूचना आ. कडू यांनी दिल्या. ईतरही मतदार संघातील विविध विषयांवर यावेळी आढावा घेण्यात आला त्यामुळे सदर बैठक रंगली होती. यावेळी तालुक्यातील पाणीटंचाईवर अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी राम सिद्येभट्टी, जीवनप्राधीकरणच्या कार्यकारी अभियंता श्वता बॅनर्जी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यु. जे. क्षिरसागर, जीवनप्राधीकरणचे उपविगीय अभियंता अरविंद सोनार, अचलपुरचे गटविकास अधिकरी रायबोले, जिल्हपरिषदेचे उपअभियंता डोंगरे, जिल्हा परिषद उपकार्यकारी अभियंत येऊले, प्रहारचे जिल्हाप्रमुख शोटू महाराज आदी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
वाढीव मोबदला देण्याची मागणी
शेतकाऱ्यांची जमिनी अधिग्रहीत करते वेळी ८४ हजार रुपये एकरप्रमाणे मोबदला देण्यात आला. आता जमिनीची किंमत वाढली असून कलम ४ नुसार जमिनी अधिग्रहीत करण्याचे काम सुरु आहे. त्यांना आजच्या किमतीनुसार वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी यावेळी केली.