व्यापाऱ्यांवर चाकूहल्ला, दगडफेकही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:57 PM2018-11-14T22:57:54+5:302018-11-14T23:01:05+5:30

शहरात मंगळवारी रात्री झालेल्या हत्येतील घटनेचे पडसाद बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास उमटले. ३० ते ४० च्या संख्येने आलेल्या जमावाने सात ते आठ व्यापारी प्रतिष्ठानांवर प्रचंड दगडफेक केली तसेच व्यापाऱ्यावर चाकुहल्ला केला.

Chakahala on the merchants; | व्यापाऱ्यांवर चाकूहल्ला, दगडफेकही

व्यापाऱ्यांवर चाकूहल्ला, दगडफेकही

Next
ठळक मुद्देबुधवार उमटले हिंसक पडसाद, ४० हल्लेखोरांचा भर बाजारात धुमाकूळव्यापारपेठ बंद : जीव मुठीत घेऊन पळाले नागरिक, एसपी झळकेंच्या उपस्थितीत कायद्याला आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरात मंगळवारी रात्री झालेल्या हत्येतील घटनेचे पडसाद बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास उमटले. ३० ते ४० च्या संख्येने आलेल्या जमावाने सात ते आठ व्यापारी प्रतिष्ठानांवर प्रचंड दगडफेक केली तसेच व्यापाऱ्यावर चाकुहल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने शहरात खरेदीसाठी आलेले नागरिक मिळेल त्या रस्त्याने जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळत सुटले होते. याप्रकरणी संतप्त व्यापाºयांनी दुकाने बंद करून पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.
प्रतिष्ठानांवर दगडफेक करण्यासोबतच आलेल्या या जमावाने स्नेहा बुक डेपोचे संचालक सुशील श्रीवास्तव यांच्यावर चाकुहल्ला केला. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर तात्काळ सर्व दुकाने बंद करून व्यापारी पोलीस ठाण्यावर धडकले आणि आरोपींच्या अटकेची मागणी करत ठिय्या आंदोलन केले. पेन्शनपुरा भागात सल्लू ऊर्फ सलमान याची मंगळवारी रात्री खून झाला. त्याचे पडसाद शहरात अशाप्रकारे उमटले. दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दगडफेक व चाकुहल्ल्यातून दहशत पसरल्याने व्यापारी वर्गामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिष्ठानांचीही नासधूस
परिसरातील तिलक एजन्सी, होले किराणा, दारासेठ किराणा, सेल बाजार, बालाजी बॅग, स्नेहा बुक डेपो, महेंद्र कृषी केंद्र, महेंद्र आॅटो पार्ट या प्रतिष्ठानांसह एका जिलेबीच्या दुकानावरसुद्धा जाऊन दगडफेक व सामानाची नासधूस करण्यात आल्याचे व्यापाºयांनी सांगितले. यावेळी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी मिळेल त्या रस्त्याने पलायन केले.
ज्वेलर्स, पेट्रोल पंप बंद
दगडफेकीची घटना शहरात पसरताच सर्व सोने-चांदीच्या दुकानांसह पेट्रोल पंप तात्काळ बंद करण्यात आले. शहरातील तणाव पाहता, परिसरातील सर्वच ठाण्यांचे अधिकारी व कर्मचाºयांसह दंगा नियंत्रण पथक तसेच अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
वचक ना ठाणेदारांचा, ना एसपींचा!
जिल्ह्याचे पोलीस प्रमुख जनता दरबाराच्या निमित्ताने अचलपूर शहरात होते. याच मुहूर्तावर गुंडगिरी प्रवृत्तीच्या युवकाच्या हत्येवरून अवघ्या ४० जणांच्या समूहाने परतवाडा शहराला दगडफेक करीत वेठीस धरले होते. एवढेच नव्हे तर एका व्यापाºयावर थेट चाकुहल्ला करण्यात आला. ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना अतिसंवेदनशील जुळ्या शहरांतील गुन्हेगारांची सलामीच होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. तरीही गावगुंड यथेच्छ हैदोस घालत होते. व्यापारी भयभीत होते, तर भाऊबीजेच्या खरेदीसाठी आलेले नागरिक नातलगांसह जीवाच्या आकांताने पळत होते. गुन्हेगार आणि गुन्हेगारीवर कुणाचाच वचक दिसला नाही. ना ठाणेदारांचा, ना जिल्हा पोलीस अधीक्षकांचा!
व्यापारी ठाण्यावर
दहशत पसरविणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करीत शेकडो व्यापाºयांनी परतवाडा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. हा सुनियोजित कटातील आरोपींना अटक न झाल्यास जुळ्या शहरांतील व्यापारी प्रतिष्ठाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.
दीड लाख लुटले
दगडफेक करणाऱ्या जमावाने स्नेहा बूक डेपोचे संचालक सुशील श्रीवास्तव यांच्यावर चाकुहल्ला केला. यावेळी दीड लाख रुपये लुटल्याची तक्रार त्यांचे बंधू कमलेश श्रीवास्तव यांनी परतवाडा पोलिसांत दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३०७, ३९५, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अतिसंवेदनशील परतवाडा-अचलपूर शहरात मंगळवारी रात्री विशिष्ट समाजाच्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी आवश्यक बंदोबस्त तैनात का केला नाही, असा सवाल व्यापाऱ्यांनी केला आहे. जाळपोळ व लुटमार करण्याचा त्यांचा इरादा असल्याचाही आरोप व्यापाºयांनी केला आहे. ठाण्यात धडकलेल्या पक्ष, संघटना, व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी भाजपचे गजानन कोल्हे, सूर्यकांत जयस्वाल, किशोर कासार, अभय माथने, अरुण घोटकर, नीलेश सातपुते, जयप्रकाश धर्मा, भरत थदानी, विजय विधानी, अमर मेघवानी, उमेश अग्रवाल, पंकज मालवीय, पंकज अग्रवाल, संजय अग्रवाल, रवि बजाज, राज बारब्दे, सुरेश अटलानी, पंकज गुप्ता आदी व्यापाºयांची या निवेदनावर स्वाक्षरी होती.

Web Title: Chakahala on the merchants;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.