कृषी महोत्सवातील ‘चकोत्रा’ लय भारी; ‘रिझवान’चाही बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:02 PM2019-01-29T23:02:55+5:302019-01-29T23:03:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पपई किंवा देवकोहळ्याच्या आकाराचे असणारे ‘चकोत्रा’ (पमेलो) या लिंबूवर्गीय फळाचा सध्या सायन्स कोअर मैदानावर ...

The 'chakra' rhythm of agriculture festival is heavy; 'Rizwan' too dominate | कृषी महोत्सवातील ‘चकोत्रा’ लय भारी; ‘रिझवान’चाही बोलबाला

कृषी महोत्सवातील ‘चकोत्रा’ लय भारी; ‘रिझवान’चाही बोलबाला

Next
ठळक मुद्देपपईएवढे लिंबूवर्गीय फळ : प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभवकथन आकर्षणाचे मुख्य केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पपई किंवा देवकोहळ्याच्या आकाराचे असणारे ‘चकोत्रा’ (पमेलो) या लिंबूवर्गीय फळाचा सध्या सायन्स कोअर मैदानावर सुरू असलेल्या कृषी महोत्सवात सध्या चांगलाच बोलबाला आहे. पश्चिम बंगाल, ओरिसा राज्यातील ज्यूसकरिता व औषधीयुक्त फळाचे आपल्याही भागात उत्पादन घेता येते का, याविषयी शेतकऱ्यात उत्सुकता दिसून आली. धामणगावचे भरत लोया यांनी चकोत्राच्या काही झाडांची लागवड केली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणाºया यशोगाथांचे सादरीकरण हा महोत्सवाचा मुख्य केंद्रबिंदू व आकर्षणाचा भाग ठरत आहे.
कृषी विभागातर्फे जिल्हा कृषी महोत्सव २७ ते ३१ जानेवारी दरम्यान सायन्स कोअर मैदानावर सध्या सुरू आहे. येथे कृषीविषयक तंत्रज्ञान, विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरवदेखील करण्यात येत आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीनुसार स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विविध योजनांची माहिती देणारी शासकीय दालने, कृषी निविष्ठा कक्ष, कृषी तंत्रज्ञान व सिंचन कक्ष, धान्यमहोत्सव, गृहपयोगी वस्तू आदी २०० कक्षांचा यामध्ये समावेश आहे. महोत्सवात शासकीय विभागांबरोबरच कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी व विविध कंपन्या यांचे कक्ष या ठिकाणी आहेत. महोत्सवात रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद शेतकरी अनुभवत आहेत.
शेतीविषयक विविध प्रकारचे संशोधन, प्रयोग, निर्यातीच्या संधी, पूरक व्यवसाय आदींबाबत एकाच ठिकाणी माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा कृषी महोत्सव ही शेतकरी बांधवांसाठी संधी आहे. शेतकरी बांधवांनी या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे उपसंचालक अनिल खर्चान, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी केले आहे.
असे आहेत विभागवार स्टॉल
कृषी महोत्सवात शासकीय विभागाचे २३, कृषी निविष्ठामध्ये बियाण्यांचे १०, खतांचे १७, कीटकनाशकांचे २७, सिंचनविषयक ४०, ट्रॅक्टर व संबंधित यंत्राविषयक १०, खाद्यपदार्थांचे १२, धान्य महोत्सवाचे २० तसेच बचत गट व वैयक्तिक स्टॉल ६० आहेत. पाच डोममध्ये असलेल्या या महोत्सवात यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांचा चांगली गर्दी दिसून आली.
रिझवान ढोबळी मिरची लक्षवेधक
टाकरखेडा पूर्णा येथील प्रतीक तायवाडे यांच्या पॉलीहाऊसमधील रिझवान ढोबळी मिरची ही पिवळ्या व लाल रंगात उत्पादित झाली आहे. संत्र्याएवढ्या आकाराच्या या मिरच्या कृषी महोत्सवात लक्षवेधी ठरली आहे.
संत्र्याएवढे थाई सीडलेस लिंबू
मोर्शी येथील अजित जोशी यांच्या बागेतील थाई सीडलेस या वाणाचे संत्र्याच्या आकाराचे कागदी लिंबू लक्ष वेधून घेतात. सूर्यखेडा येथील गंगाधर बेलसरे यांच्या शेतातील सीताफळदेखील आकर्षणाचा भाग ठरले आहेत.

Web Title: The 'chakra' rhythm of agriculture festival is heavy; 'Rizwan' too dominate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.