*अंजनगावात चक्रधरस्वामी अष्टशताब्दी महोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:14 AM2021-09-11T04:14:00+5:302021-09-11T04:14:00+5:30
अंजनगाव सुर्जी : तंवरनगरातील द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टमध्ये तसेच अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या प्रेरणेने अंजनगाव तालुका ग्रामीण ...
अंजनगाव सुर्जी : तंवरनगरातील द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टमध्ये तसेच अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या प्रेरणेने अंजनगाव तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ आयोजित श्री पंचकृष्ण महिला मंडळाद्वारे श्री चक्रधरस्वामी अष्टशताब्दी महोत्सव ८ सप्टेंबरला साजरा झाला. गोपालमुनी पंजाबी यांच्या हस्ते प्रथम देवपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कवीश्वर कुलभूषण आचार्य प.पु.म. श्री प्रवर नागराज बाबा, प.पु.म. गोपालमुनी दादा पंजाबी, आमदार बळवंत वानखडे व विनयमुनी वैरागीबाबा पंजाबी, पोलीस उपनिरीक्षक प्रेमराज मावंदे व नंदकिशोर पाटील हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष कमलेश पटेल, भाजपचे मनोहर मुरकुटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू, पुरुषोत्तम घोगरे, शिवसेनेचे विकास येवले, सुधाकर खारोडे, माजी सभापती अरुण खारोडे यांचा शाल, श्रीफळाने स्वागत करण्यात आले.
आपल्या पंथीय कार्यात सोबत असल्याचे आ. बळवंत वानखडे यांनी सांगितले. जळगावचे गोपालमुनी पंजाबी यांनी प्रवचनातून भक्तांना अध्यात्म विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. .पु.म. श्री विनयमुनी उपाख्य वैरागीबाबा पंजाबी यांनी सर्वांचे आभार मानत मनोगत व्यक्त केले. देव दर्शन, साधू संत भोजन व नंतर भक्तगणांसाठी भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.