शीतलचा मोबाईल शोधण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 10:20 PM2018-03-30T22:20:21+5:302018-03-30T22:20:21+5:30

शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी सुनील गजभिये व रहमान खान यांनी एक्स्प्रेस हायवे स्थित जुन्या टोल नाक्याजवळील विहिरीत शीतलचा मोबाइल फेकून दिला.

The Challenge of Finding the Mobile of Sheetal | शीतलचा मोबाईल शोधण्याचे आव्हान

शीतलचा मोबाईल शोधण्याचे आव्हान

Next
ठळक मुद्देपोलिसांची दमछाक : ४० फूट उपसा, तरीही पाणी शिल्लक

आॅनलाईन लोकमत
अमरावती : शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी सुनील गजभिये व रहमान खान यांनी एक्स्प्रेस हायवे स्थित जुन्या टोल नाक्याजवळील विहिरीत शीतलचा मोबाइल फेकून दिला. विहिरीतील तो मोबाइल बाहेर काढण्यासाठी गाडगेनगर पोलीस दोन दिवसापासून पाण्याचा उपसा करीत आहेत. मात्र, अजूनही विहिरीत २० ते ३० फूट पाणी शिल्लक असल्यामुळे मोबाइल शोधण्याचे आव्हान कायमच आहे.
शीतल पाटील हत्याकांडात गाडगेनगर पोलिसांनी मुख्य आरोपी सुनील गजभिये, त्याचा साथीदार रहमान खान, गुन्ह्यात सहकार्य करणारा गडचिरोलीतील शिवदास गोंडाणे व गजभियेची पत्नी राजेश्री यांना अटक केली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आता ठोस पुरावे गोळा करण्याच्या कामी पोलीस लागले आहेत.
शीतल पाटीलच्या हत्येनंतर तिचा मोबाइल विहिरीत फेकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यानुसार गाडगेनगर पोलीस विहिरीत फेकलेल्या मोबाइलचा शोध घेत आहेत. यासाठी विहिरीतील पाण्याचा उपसा करून मोबाइल हाती लागेल, या आशेवर पोलीस आहेत. बुधवारी सायंकाळपासून गाडगेनगर पोलीस विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याच्या कामी लागले. दोन मशीनद्वारे पाणी उपसा करण्याचे काम सातत्याने सुरुच आहे. मात्र, सुमारे ५० फूट व्यास असणाऱ्या या विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात पोलिसांची दमछाक उडाली आहे. दोन दिवसात २० फुटांवर पाण्याचा उपसा करण्यात आला असला तरी अद्याप पाण्याची बरीच पातळी शिल्लक आहे. त्यातच विहिरीतील झºयांमुळे पुन्हा विहिरीत पाणी जमा होत असल्याने उपसा करणेही कठीण झाले आहे. मात्र, शीतलचा मोबाइल बाहेर काढणे तपासासाठी आवश्यक ठरले आहे. पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळते किंवा नाही, ही बाब मोबाइल सापडल्यावर कळणार आहे. शनिवारी गजभिये व रहमानला पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल.
निर्जन स्थळावरील विहिरीतून रहस्य उलगडणार का?
एक्स्पे्रस हायवेवरील विहिरीजवळ देहविक्रीचा अड्डाच असल्याचे आढळून आले होते. त्या ठिकाणी सापडलेले आक्षेपार्ह साहित्य प्रेमीयुगुलांच्या अश्लील चाळ्यांचे कथन करणारे होते. अशा आक्षेपार्ह स्थळावरील विहिरीचा उपसा सुरु झाला असून, विहिरीचे तळ गाठल्यानंतर आणखी तथ्य पुढे येण्याची शक्यता आहे. एक्स्प्रेस हायवेवरून सातत्याने मोठ्या वाहनांचे आवागमन सुरु राहते. अनेकदा ट्रकचालकांचे वाद होतात. अशा वेळी गुन्हे लपविण्यासाठी विहिरीचा वापर होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विहिरीचा उपसा सातत्याने सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत तळ गाठले नाही. पाणी अधिक असल्यामुळे तळ गाठण्यास वेळ लागत आहे. तळ गाठेपर्यंत पाण्याचा उपसा करूच.
- मनीष ठाकरे,
पोलीस निरीक्षक,

Web Title: The Challenge of Finding the Mobile of Sheetal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.