चार दिवसांत पाचशेवर प्रवेशाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:45+5:302021-07-07T04:14:45+5:30
अमरावती : आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. लॉटरी पद्धतीने निवड झालेले केवळ ...
अमरावती : आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. लॉटरी पद्धतीने निवड झालेले केवळ ६०३ जणांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत तसेच ८५६ विद्यार्थ्यांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. आता चार दिवसांत ५२१ प्रवेश करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर उभे ठाकले आहे.
आरतीई प्रवेश प्रक्रियेसाठी ७ एप्रिल रोजी पहिली सोडत काढण्यात आली होती. मात्र, कोरोना संख्या वाढल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार ३० जूनपर्यंत यासाठी मुदत दिली होती. आता ही मुदत पुन्हा ९ जुलैपर्यंत वाढविली. ५ जुलैपर्यंत आरटीईत ६०३ जणांचे प्रवेश झाले आहेत. यावर्षी आरटीईसाठी जिल्हाभरातून २४४ शाळांनी नोंदणी केली होती. यात २०७६ प्रवेशासाठी जागा आहेत. याकरिता ५९१८ पालकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी लॉटरी पद्धतीने पहिल्या फेरीत १९८० बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित प्रवेश पूर्ण करण्यासाठी चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे. परिणामी हे प्रवेश पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील शाळांनी केली नोंदणी २४४
पहिल्या टप्प्यात निवड झालेले बालके १९८०
आतापर्यंत बालकांनी घेतला प्रवेश ६०३
बालकांचे तात्पुरते प्रवेश ८५६
बॉस
जिल्ह्यातील एकूण उपलब्ध जागा २०७६
जिल्ह्यातून आलेल्या अर्ज ५९१८
बॉक्स
कोरोनाचा फटका
आरटीई प्रवेश प्रक्रियेस गतवर्षापासून कोरोनाचा फटका बसत आहे. गतवर्षी ७ एप्रिल रोजी लॉटरी काढण्यात आल्यानंतर प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. जून महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने ११ जूनपासून शाळास्तरावर प्रवेशास प्रारंभ करण्यात आला आहे.