१२ दिवसांत चार लाख क्विंटल तूर खरेदीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 11:56 PM2018-05-02T23:56:44+5:302018-05-02T23:57:04+5:30

जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रांना १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी दहा दिवसांत १२ पैकी चार केंदे्रच सुरू झालेली आहेत. अद्याप आठ केंद्र बंद आहेत.

Challenge of purchasing four lakh quintals of tur in 12 days | १२ दिवसांत चार लाख क्विंटल तूर खरेदीचे आव्हान

१२ दिवसांत चार लाख क्विंटल तूर खरेदीचे आव्हान

Next
ठळक मुद्दे४२ हजार शेतकरी प्रतीक्षेत : मुदतवाढीनंतरही चार केंद्रेच सुरू, आठ बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रांना १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी दहा दिवसांत १२ पैकी चार केंदे्रच सुरू झालेली आहेत. अद्याप आठ केंद्र बंद आहेत. तूर खरेदीच्या नावावर खरेदीदार यंत्रणांंद्वारा टाइमपास सुरू असल्याने उर्वरित १२ दिवसांत टोकन दिलेल्या ४२ हजार ४०२ शेतकऱ्यांची किमान चार लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचे आव्हान आहे
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून १२ तूर खरेदी केंद्रांवर १८ एप्रिलपर्यंतच आॅनलाइन नोंदणीचे पणन विभागाचे आदेश होते. त्यानुसार आतापर्यंत ७० हजार १९७ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केलीे. २७ हजार ७९५ शेतकºयांची ४.३७ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. आता केंद्रांना १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी अमरावती, चांदूरबाजार, दर्यापूर व तिवसा केंद्रांवरच खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. उर्वरित १२ दिवसांत ४२,४०२ शेतकºयांकडून तूर खरेदी आवश्यक आहे. मात्र, पणनसह व्हीसीएमएफद्वारा तूर खरेदीच्या नावावर टाइमपास करण्यात येत आहे. शासनाने घोषणा करायची, शेतकºयांना दिलासा द्यायचा अन् खरेदीदार यंत्रणाद्वारा शेतकºयांची वाट लावायची; हाच गोरखधंदा यंदाच्या हंगामात सुरू आहे. मागील वर्षी याच यंत्रणाद्वारा दिवसाला १५ हजार क्विंटलपर्य$ंत तूर खरेदी करण्यात आली. यंदा मात्र गोदाम, ग्रेडर आदी कारणे दाखवून दिवसाला दोन हजार क्विंटलपर्यंतच तूर खरेदी करण्यात येत आहे. शासनाने मुदतवाढ दिली असताना पणन विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे शेतकºयांचा चार लाख क्विंटलपेक्षा अधिक शेतमाल घरी पडून आहे. व बाजार समित्यांचे नियंत्रण नसल्यामुळे व्यापारी हमीपेक्षा कमी भावाने शेतमालाची खरेदी करीत असल्याचे वास्तव आहे.
केंद्रनिहाय नोंदणी
सध्या अचलपूर केंद्रावर ८,८६३, अमरावती ८,६१३, अंजनगाव सुर्जी ४,७०९, चांदूरबाजार ६,११२, चांदूर रेल्वे ४,७४३, दर्यापूर ७,२२६, धारणी ९३५, नांदगाव ४,७३४, तिवसा २,७८६, मोर्शी ७,४१५, धामणगाव ६,४६४ व वरूडमध्ये ७,५०७ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली.
केंद्रनिहाय खरेदी
अचलपूर केंद्रावर ३८,२८९, अमरावती ६०,७६७, अंजनगाव सुर्जी २६,३४९, चांदूर रेल्वे ३५,६८८, चांदूरबाजार ३३,५४६, दर्यापूर ७०६०७, धारणी ७,०१२, नांदगाव खंडेश्वर २१,८०४, धामणगाव २८,८४१, तिवसा २४,८२५, मोर्शी ५२,०६१ व वरुड ३७,८०३ क्विंटल तूर खरेदी झाली आहे.

आयटीसीचे गोदाम उपलब्ध झाले आहे. मंगळवारी कामगार दिनामुळे केंद्र बंद होती बुधवारपासून सर्व केंद्रावर खरेदी सुरू करण्यात आलेली आहे.
- रमेश पाटील
जिल्हा विपणन अधिकारी

Web Title: Challenge of purchasing four lakh quintals of tur in 12 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.