विदर्भात वनवणवा रोखणे ‘चॅलेंजिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:49 PM2018-04-11T16:49:07+5:302018-04-11T16:49:07+5:30

यंदा विदर्भातील जंगलात फेब्रुवारी, मार्चपासून आग लागण्याचा घटना घडत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आजही वनविभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव आहे

Challenging the withdrawal of Vidarbha | विदर्भात वनवणवा रोखणे ‘चॅलेंजिंग’

विदर्भात वनवणवा रोखणे ‘चॅलेंजिंग’

googlenewsNext

गणेश वासनिक  
अमरावती : यंदा विदर्भातील जंगलात फेब्रुवारी, मार्चपासून आग लागण्याचा घटना घडत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आजही वनविभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव आहे. त्यामुळे यंदा विदर्भातील वनवणवा रोखणे वनविभागासाठी ‘चॅलेंजिंग’ ठरणारे आहे.  दुसरीकडे वन्यप्राण्यांना तृष्णा भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
राज्यात प्रादेशिक वनविभाग, व्याघ्र प्रकल्पात लाखोे हेक्टर जमीन आहे. या जमिनीवर वन्यपशू, वनसंपदा अस्तित्वात आहे. मार्च, एप्रिलमध्ये दरवर्षी वणवा पेटून हजारो हेक्टर जमिनीवरील वनसंपदा नष्ट होतात. वन्यपशू आगीच्या भक्ष्यस्थानी सापडतात. गतवर्षी ७० हजार हेक्टर जंगलवनवणव्याने व्यापल्याची नोंद वनविभागात झाली आहे. वनविभागाचे प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी फेब्रुवारीत राज्यातील वनाधिका-यांना पत्र पाठवून वणवा रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वनविभागाने वनवणव्यावर लगाम लावण्यासाठी काही उपयायोजनाही केल्या आहेत. ज्या वनखंडात तेंदूपत्ता संकलनाची कामे सुरू आहेत, त्या जंगलाला आग लागल्यास तेंदूपत्ता संकलन करणाºया कंत्राटदाराचे परवाने रद्द करून दंडात्मक रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मोहफूल वेचणाºयांवर लक्ष, शिकाºयांवर पाळत, कुरण विकास आदी उपक्रम सुरू आहे. जंगलांना आग लागू नये, याची खबरदारी वनविभाग घेत असताना अचानक दोन दिवसांपूर्वीच्या अवकाळी पावसाने वनविभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. जंगलात वनवणवा हा मार्च ते मे या कालावधीत लागतो. याच महिन्यात जंगलात आग लागू नये, याची खबरदारी घेतली जाते. परंतु यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने ही बाब वन्यपशुंसाठी उन्हाळ्यात धोकादायक ठरणारी आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यपशुंना त्यांच्या सुरक्षित क्षेत्रातच पाणी, भक्ष्य मिळविणे कठीण झाले आहे. गतवर्षी विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे सॅटेलाईट सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले होते. यावर्षी चंद्रपूर, यवतमाळ, ताडोबा, मेळघाटच्या सेमाडोह, अमरावती नजीकच्या वडाळी, पोहरा, चांदूर रेल्वे जंगलात आग लागण्याच्या घटना घटल्या आहे. मात्र, अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची वानवा, पाणीटंचाई आदी बाबी उपलब्ध होत नसल्याने आगीवर ंिनयंत्रण मिळविताना वनविभागाला कसरत करावी लागणार आहे.
     
वनकर्मचाºयांना अलर्ट राहण्याच्या सूचना
 मार्च महिना सुरू झाला की, जंगलात गवत वाळू लागतात. यावर्षी विदर्भातील जंगलात हीच स्थिती आहे. वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी व्याघ्र प्रकल्पात कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. जंगलात आग आणि शिकाºयांवर पाळत ठेवण्यासाठी वनकर्मचाºयांना अलर्ट राहण्याचा सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. 
आगीवर सॅटेलाईटने लक्ष
जंगलात मनुष्यनिर्मित अथवा अचानक लागणाºया आगीवर वनविभाग सॅटेलाईटने लक्ष्य ठेवून आहे. डेहरादून येथील वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून राज्यात वनवणव्यावर सॅटेलाईटने लक्ष्य ठेवले जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात जंगलांना आग लागण्याची घटना घडल्या आहेत. मात्र, मे महिन्यात वनवणवा पेटू नये, याची दक्षता घेतली जात आहे.

‘‘ मार्च, एप्रिलमध्ये जंगलांना आग लागण्याचा दरवर्षीचाच अनुभव आहे. त्यामुळे वनविभाग यावेळी सज्ज आहे. जाळरेषा तयार करण्यात आल्या असून एका वनबिटमध्ये एक मजूर नियुक्ती आहे. आग विझवणारे कर्मचारी नेमण्यात आले आहे. मे महिन्यात विशेष काळजी घेतली जाणार आहे.
- हेमंत मीणा,
उपवनसंरक्षक, अमरावती

Web Title: Challenging the withdrawal of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.