तीन दिवसांत मान्सूनची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:48+5:302021-06-10T04:09:48+5:30
अमरावती : उत्तर बंगालच्या उपसागरात ११ तारखेला तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात १० जूनपासून पावसाच्या प्रमाणात ...
अमरावती : उत्तर बंगालच्या उपसागरात ११ तारखेला तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात १० जूनपासून पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. १२ जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या वादळामुळे विदर्भात १४ जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी बुधवारी वर्तविला.
दरम्यान मान्सूनचा पाऊस कोंकण, मुंबई, मालेगाव, नागपूरपर्यंत पोहचला आहे. पुढील तीन-चार दिवसात अमरावती, अकोलासह पूर्ण विदर्भ व्यापण्याची शक्यता आहे. शुक्रवारी बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात १२ आणि १३ जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
बॉक्स
असा आहे पावसाचा अंदाज
जिल्ह्यासह विदर्भात १०,११,१२ व १३ जूनला बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह, १२ व १३ जूनला काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी, १४ ते १६ दरम्यान पावसाची तीव्रता वाढणार असल्याचे अनिल बंड म्हणाले.