वादळासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता, शेतकऱ्यांची वाढली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 06:43 PM2023-03-15T18:43:45+5:302023-03-15T18:47:18+5:30
गहू, हरभरा काढणीला; हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती
गजानन मोहोड
अमरावती : हिमालयावर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. एक नवीन पश्चिमी विक्षोभ १६ मार्चला हिमालयावर धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणारे दक्षिण पूर्व बाष्पयुक्त वारे आणि हवेच्या मधल्या थरातून येणारे पश्चिम वारे यांच्या प्रभावामुळे १६ व १७ मार्चला जिल्ह्यासह विदर्भात बरेच ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात विजांचा गडगडाट व वेगवान वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
अकोला, गोंदिया जिल्ह्यांव्यतिरिक्त उर्वरित विदर्भात बरेच ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. २२ मार्चपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता राहणार आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू व हरभरा काढणीला आला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे