२८ जुलैपर्यंत पावसाची शक्यता (सारांश)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:10 AM2021-07-22T04:10:08+5:302021-07-22T04:10:08+5:30
----------------------------------------------- जिल्ह्याचा संक्रमणमुक्तीचा दर उच्चांकी (फोटो) अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने संक्रमणमुक्तीचा दर ९८.२६ टक्क्यांपर्यंत पोहोचला. एकूण ...
-----------------------------------------------
जिल्ह्याचा संक्रमणमुक्तीचा दर उच्चांकी
(फोटो)
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने संक्रमणमुक्तीचा दर ९८.२६ टक्क्यांपर्यंत पोहोचला. एकूण संक्रमितांच्या तुलनेत हे प्रमाण उच्चांकी असल्याचा अहवाल आहे.
--------------------------------------------------
पिके खरडल्यामुळे दुबार पेरणी
अमरावती : जिल्ह्यात काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे किमान तीन हजार हेक्टरमधील पिके खरडली गेल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
---------------------------------------
पिकांचे पंचनाम्याची लगबग
अमरावती : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी कृषी व महसूल विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांद्वारे पिकांचे पंचनाम्यास गती आलेली आहे.
-----------------------------------------
संचारबंदीत नागरिकांचा संचार
अमरावती : जिल्ह्यात ५ वाजतापासून संचारबंदीचे आदेश आहेत. मात्र, यानंतरही नागरिकांचा मुक्त संचार तसेच अंतर्गत भागातील काही दुकाने सुरू असल्याचे चित्र आहे.
-------------------------------------------
पीक विम्याचा लाभ मिळावा
अमरावती : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे व पेरणीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक विमा योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.