'चंद्रभागा आपल्या दारी' दर्यापुरात फिरत्या जलाशयाचा आदर्श उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 08:51 PM2020-09-03T20:51:26+5:302020-09-03T20:52:55+5:30
करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उपक्रम चंद्रभागा आपल्या दारात या कल्पक उपक्रमाला दर्यापूर शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जलवृक्ष चळवळ, दर्यापूर नगर परिषद, संत गाडगेबाबा महिला मंडळ, विविध सामाजिक संघटनाच्या संयुक्त पुढाकाराने आयोजित आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उपक्रम चंद्रभागा आपल्या दारात या कल्पक उपक्रमाला दर्यापूर शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
करोनाच्या काळात स्थानिक चंद्रभागेच्या तिरावर गणेश विसर्जनाची गर्दी होवू नये तसेच मुर्तीची कुठलीही विटंबना न होता पर्यावरण पुरक पद्धतीने गणरायाचे विसर्जन व्हावे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर्यापूर न.प.च्या प्रवेशद्वाराजवळ तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, मुख्याधिकारी गिता वंजारी, ठाणेदार तपण कोल्हे, सागर गावंडे, बाबू भाई, नगरसेवक असलम घानीवाले, उध्दव नळकांडे यांचे उपस्थितीत सजवलेल्या विसर्जन कुंड आणि निर्माल्य रथासह उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
शहराच्या विविध प्रभागातून विसर्जन कुंड व निर्माल्यरथ फिरवण्यात आले. सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 6 वाजे पर्यंत या उपक्रमाद्वारे हजारो गणेश मुतीर्चे संकलन करून अरूण पाटील गावंडे यांच्या शेत तलावात गणेशाचे विधीवत विसर्जन करण्यात आले.