पश्चिम बंगालमधील हिंसेचा चांदूर बाजार भाजपतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:39+5:302021-05-06T04:12:39+5:30
तहसीलदारांना निवेदन चांदूर बाजार : भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होत असलेल्या ...
तहसीलदारांना निवेदन
चांदूर बाजार : भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होताच, तृणमूल काँग्रेसचे पदाधिकारी व गुंडांनी हिंसाचार सुरू केला. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. जय-पराजय हा जनतेचा कौल असतो. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने हिंसा घडवून देशाच्या लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. ममता बनर्जी यांच्या हुकूमशाहीच्या दबावात हे होत आहे. केंद्र सरकारने राष्ट्रपती शासन लावून होणाऱ्या हिंसाचार थांबवावा व शांती प्रस्थापित करावी. या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मुरली माकोडे, सरचिटणीस गोपाल तिरमारे, युवा मोर्चा अध्यक्ष आशिष कोरडे, सरचिटणीस गजानन राऊत, शुभम तरारे, सचिन देशमुख हे उपस्थित होते.