चांदूरमध्ये १७ हजार हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:52 PM2018-02-12T22:52:04+5:302018-02-12T22:52:23+5:30

रविवारी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने तालुक्यातील २०,५५८ शेतकऱ्यांचे १७ हजार १०३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला.

Chandur damages 17 thousand hectares | चांदूरमध्ये १७ हजार हेक्टरचे नुकसान

चांदूरमध्ये १७ हजार हेक्टरचे नुकसान

Next
ठळक मुद्दे२० हजार ५५८ शेतकऱ्यांचा समावेश : संत्रा, कांदा, हरभरा, गहू पिकांना फटका

सुमित हरकुट।
आॅनलाईन लोकमत
चांदूरबाजार : रविवारी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने तालुक्यातील २०,५५८ शेतकऱ्यांचे १७ हजार १०३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला. अन्य तालुक्याच्या तुलनेत सर्वाधिक नुकसान चांदूरबाजार तालुक्यात झाले आहे.
तालुक्यातील सात मंडळांतील १५४ गावांना गारपिटीने गारद केले. यात शेतकऱ्यांचा संत्रा, कांदा, हरभरा पिकाचे नुकसान झाले. चांदूरबाजार मंडळात ४२७८ हेक्टरमध्ये नुकसान झाले. बेलोरा मंडळात ४५० हेक्टर, तळेगाव मोहना मंडळात ३ हजार ४६९ हेक्टर, करजगाव मंडळात १९० हेक्टर, आसेगाव मंडळात ५९५ हेक्टर, शिरजगाव कसबा मंडळात ४ हजार ३१६, ब्राह्मणवाडा थडी मंडळात ३८०५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. संत्रापिकाचे ६ हजार ८९५ हेक्टर, कांदा पिकाचे १ हजार ५०३ हेक्टर, गहू १ हजार ७६७ हेक्टर, हरभरा ३ हजार ९३८ हेक्टर व अन्य पिकांचे १४० हेक्टरमधील नुकसान झाले. वादळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषिसेवक व मंडळ अधिकाºयांना दिले असल्याचे तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सांगितले. याचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाने मदत जाहीर करावी, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
अधिकारी-शेतकरी पंचनाम्यासाठी शेतात
महसूल विभाग, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासह तलाठी, कृषिसेवक, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी सरपंच व गावातील दोन प्रतिष्ठित शेतकरी यांच्याशी संपर्क साधून शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रारंभ झाला आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका शिरजगाव कसबा मंडळाला बसला आहे.
तालुका कृषी अधिकाऱ्याचे पद रिक्त
नुकसानीचा खरा अंदाज येण्यासाठी आणखी काही अवधी लागेल. कृषी व महसूल विभाग एकत्र काम करीत आहेत. मात्र, तालुका कृषी अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने कृषी विभागात समन्वयाचा अभाव आहे. खरी आकडेवारी महसूलला द्यावी, यासाठी कृषी विभागाचे अधिकारी चकरा मारत आहेत.
अचलपूर तालुक्यातील ५७ गावांत नुकसान
रविवारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका अचलपूर तालुक्यातील ५७ गावांना बसला. त्यामध्ये अडीच हजार हेक्टरवर फळपिके, तर ३८७५ हेक्टरवरील शेती पिके असे एकूण ७९६९ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार निर्भय जैन यांनी दिली.

Web Title: Chandur damages 17 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.