चांदूर रेल्वेत "संविधान बचाव दिन"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:24+5:302021-04-16T04:12:24+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे आयोजनचांदूर रेल्वे : शहरात गाडगेबाबा मार्केटमधील सी.सी.एन. कार्यालयासमोर अखिल भारतीय ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे आयोजनचांदूर रेल्वे : शहरात गाडगेबाबा मार्केटमधील सी.सी.एन. कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवारी ‘संविधान बचाव दिन’ म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देविदास राऊत हे होते. प्रथम राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे गुरू थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. घटनेच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर वीरा साथीदार यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालन विजय रोडगे यांनी केले. यावेळी देविदास राऊत, विजय रोडगे, विनोद जोशी, रामदास कारमोरे, नितीन गवळी, महमूद हुसेन, विनोद लहाने, चरण जोल्हे, नीळकंठ दिघडे, बालकदास लोखंडे, प्रभाकर कडू, प्रभाकर भगत, राजेंद्र हिरडे, प्रसेनजीत तेलंग, सुधाकर नाचणकर, नीलेश कापसे आदी उपस्थित होते.
सर्वसामान्यांना चांगले जीवनमान देणारे कायदे नष्ट करून ‘घटना’ फक्त निवडणुकीपुरतीच जिवंत ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. याविरुद्ध सर्वसामान्य जनता आपल्या शक्तीनुसार व लोकक्षमतेनुसार रस्त्यावर आंदोलन करीत आहेत. पण, त्यांच्यावर दडपशाही सुरू आहे. यात भारतीय राज्यघटनेची पायमल्ली होताना दिसत आहे. म्हणून आम्ही घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संविधान बचाव दिन म्हणून साजरी करीत असल्याचे किसान संघर्ष समितीने सांगतिले.