चांदूर रेल्वेत पहिलवानांची वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:24 AM2019-02-24T01:24:42+5:302019-02-24T01:26:25+5:30
येथील जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाच्यावतीने स्थानिक अशोक महाविद्यालयाच्या मैदानावर दोन दिवसीय कुस्ती सामन्यांना शनिवारी थाटात प्रारंभ झाला. अवघे शहर कुस्तीमय झाल्याचे सुखद चित्र आहे. जय हिंद क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे.
चांदूर रेल्वे : येथील जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाच्यावतीने स्थानिक अशोक महाविद्यालयाच्या मैदानावर दोन दिवसीय कुस्ती सामन्यांना शनिवारी थाटात प्रारंभ झाला. अवघे शहर कुस्तीमय झाल्याचे सुखद चित्र आहे. जय हिंद क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शनिवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी शहरात आलेल्या कुस्तीवीरांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई, पुणे, अहमदनगर, नागपूर यासोबत अनेक शहरातून कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शहरात आले आहेत. तुर्तास आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू तेजस्विनी दहिकर, अनिल तोडकर, राज्यस्तरीय विजेते खेळाडू गूलाब आगरकर यांच्यासह हरियाणाचे हिंदकेसरी युद्धविर व दिल्लीचे प्रवीण भोला दाखल झाले आहेत.
कुस्ती स्पर्धेचे उदघाटक म्हणून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य तर प्रमुख पाहूणे म्हणून विशेष पोलिस महानिरिक्षक श्रीकांत तरवडे, प्रसिद्ध उद्योगपती दिलीप गिरासे, निलेश विश्वकर्मा, विदर्भ केसरी संजय तिरथकर आदींची उपस्थिती होती. संपूर्ण शहरात कुस्ती पाहण्यासाठी तरुण तसेच क्रीडा प्रेमींची गर्दी उसळली आहे.