चांदूर तहसीलची झाडाझडती

By admin | Published: June 4, 2014 11:21 PM2014-06-04T23:21:39+5:302014-06-04T23:21:39+5:30

जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी चांदूरबाजार तहसील कार्यालयाला बुधवारी सकाळी ११.३0 वाजता अचानक भेट दिली. गारपीटग्रस्तांचे अनुदान शेतकर्‍यांच्या बॅंक खात्यात अद्याप जमा झाले नसल्याचे

Chandur tehsil tree plantation | चांदूर तहसीलची झाडाझडती

चांदूर तहसीलची झाडाझडती

Next

चांदूरबाजार: जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी चांदूरबाजार तहसील कार्यालयाला बुधवारी सकाळी ११.३0 वाजता अचानक भेट दिली. गारपीटग्रस्तांचे अनुदान शेतकर्‍यांच्या बॅंक खात्यात अद्याप जमा झाले नसल्याचे पाहून ते अवाक झाले. त्यांनी लगेच बँक अधिकार्‍यांची बैठक घेऊन अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले.
यावेळी त्यांनी सर्वप्रथम तहसील कार्यालयामधील पुरवठा विभागाला भेट देऊन अन्नसुरक्षा योजनेतील धान्य वाटपाची चौकशी केली. या विभागात सध्या प्रभारी पुरवठा निरीक्षकांच्या सोबतीला केवळ एक महिला सहाय्यक लिपिक आहे. वास्तविक पुरवठा विभागात दोन कर्मचारी आवश्यक असताना पुरवठा निरीक्षकांची बदली झाल्यानंतरही येथे कोणतीच नियुक्ती करण्यात आली नाही. या विभागात कार्यरत पुरवठा निरीक्षकांकडे प्रभारी पुरवठा अधिकार्‍याचा कारभार आहे. ही बाब सुध्दा जिल्हाधिकार्‍यांच्या लक्षात आणून देण्यात आली.
याशिवाय शेतकर्‍यांच्या नोंदी, फेरफार, त्यांना मिळणार्‍या संगणकीय ७/१२ विषयीच्या समस्या जिल्हाधिकार्‍यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील शेतकर्‍यांना अनुदान वितरण करणार्‍या बँक व्यवस्थापकांची बैठक बोलावली.  यात तालुक्यातील १६ बँक व्यवस्थापकांना बैठकीत सहभागी होण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातील एसबीआय, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक उपस्थित होते. यावेळी प्रथमच येथून १८ किमीवर अंतरावर असलेल्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत गारपिटीचे अनुदान देण्याबाबत तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. या संबंधीचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी प्रभारी तहसीलदारांना दिले. रिक्तपदाची समस्या लवकरच सोडविण्याचे आश्‍वासन यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी उपस्थित पत्रकारांना दिले. जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या झाडाझडतीची बरीच चर्चा होती.

Web Title: Chandur tehsil tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.