चांदूररेल्वे-धामणगाव एसटी उलटली, प्रवासी सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 10:44 PM2018-02-17T22:44:41+5:302018-02-17T22:45:01+5:30
येथून धामणगावकरिता निघालेली बस तुळजापूर येथे रस्त्याच्या कडेला शनिवारी दुपारच्या सुमारास उलटली. सुदैवाने या बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमांवर निभावले.
आॅनलाईन लोकमत
चांदूररेल्वे : येथून धामणगावकरिता निघालेली बस तुळजापूर येथे रस्त्याच्या कडेला शनिवारी दुपारच्या सुमारास उलटली. सुदैवाने या बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमांवर निभावले.
चालक ए.आर. गजभिये व वाहक ए.एस. धोटे हे चांदूर रेल्वे आगाराची एमएच ४० वाय ५१०४ क्रमांकाची बस घेऊन धामणगावकरिता निघाले होते. त्यामध्ये जवळपास ४० ते ६० प्रवासी होते. तुळजापूरनजीक रस्त्याच्या कडेला ही बस उलटली. यामुळे अब्राहम (रा. दत्तापूर धा.), प्रवीण शंकरलाल रॉय (रा. धामणगाव रेल्वे) व गोदाबाई मानवटकर (रा. शिरजगाव कोरडे) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.
दरम्यान, बस उलटल्याचे लक्षात येताच येथून जाणाºया वाहनचालकांनी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यावरून पोलीस निरीक्षक ब्रम्हा शेळके यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले आणि जखमींना उपचाराकरिता चांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. याप्रकरणी चालकाविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालविण्याचा भादंविच्या कलम २७९ व अन्वये गुन्हा नोंदविल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच प्रवाश्यांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात एकच गर्दी केली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवितहानी झालेली नाही.