सीपी बदलले, छायाचित्र मंडलिकांचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:28 PM2018-08-13T22:28:53+5:302018-08-13T22:29:19+5:30
नवे शहर पोलीस आयुक्त संजय बाविस्कर रुजू होऊन आठवडा उलटत असताना संकेतस्थळावर मात्र जुने आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांचे छायाचित्र झळकत आहे. सायबर सेल व ठाण्याची कार्यपद्धती अपडेट राहायला हवी, मात्र, ही लेटलतिफी नाही तर काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवे शहर पोलीस आयुक्त संजय बाविस्कर रुजू होऊन आठवडा उलटत असताना संकेतस्थळावर मात्र जुने आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांचे छायाचित्र झळकत आहे. सायबर सेल व ठाण्याची कार्यपद्धती अपडेट राहायला हवी, मात्र, ही लेटलतिफी नाही तर काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे, सायबर गुन्हेगार सातत्याने नागरिकांना फसवित आहेत, अशा स्थितीत सायबर सेलने अपडेट राहण्याची नितांत गरज आहे. मोबाईल ट्रेस करण्यात सायबर पोलीस तत्पर आहेत. याशिवाय अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र इतके सर्व कार्य करीत असताना त्यांची वेबसाईडकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. यावरून हीच काय सायबर पोलिसांची तत्परता असाही प्रश्न एकीकडे उपस्थित होत आहे.
डीसीआरची वेळ अनिश्चित
डेली क्राईम रिपोर्ट (डिसीआर)ची माहिती वेबसाईडवर रोज अपलोड केली जाते. मात्र, या वेळेत मोठी तफावत येत आहेत. अनेकदा तर डीसीआर अपलोडच केला जात नाही. आपल्या सवडीनुसार सायबर पोलीस डीसीआर अपलोड करतात. ही अडचण का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
सायबर पोलिसांकडून वेबसाईड अपडेटची प्रक्रिया सुरू आहे, लवकरच तेही काम पूर्ण केले जाईल.
- कांचन पांडे,
सहायक पोलीस निरीक्षक