शिक्षण पद्धतीत बदल गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:24 AM2019-08-12T01:24:45+5:302019-08-12T01:25:13+5:30

आताची शिक्षण पद्धती ही कारकून शिक्षण पद्धती आहे. यामध्ये पूर्णपणे बदल करण्याची गरज आहे. इयत्ता सातव्या वर्गापासून विद्यार्थ्यांना कॉऊन्सलिंग करून त्यांना प्रॅक्टिकल व्यावसायिक शिक्षण देणे काळाची गरज आहे.

Changes in education system need to be made | शिक्षण पद्धतीत बदल गरजेचे

शिक्षण पद्धतीत बदल गरजेचे

Next
ठळक मुद्देउदय देशमुख : उद्योग उभारणी, रोजगार निर्मितीवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आताची शिक्षण पद्धती ही कारकून शिक्षण पद्धती आहे. यामध्ये पूर्णपणे बदल करण्याची गरज आहे. इयत्ता सातव्या वर्गापासून विद्यार्थ्यांना कॉऊन्सलिंग करून त्यांना प्रॅक्टिकल व्यावसायिक शिक्षण देणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून ‘विद्युत तयार करण्यापासून तर फॅक्टरी कशी उभारावी’ या सारखे विषय समाविष्ट केले पाहिजे, असे मत स्थानिक श्रीचक्रधर इंडस्ट्रीज लि.चे संस्थापक चेअरमन उदय देशमुख यांनी व्यक्त केले.
जिजाऊ ब्रिगेडच्या ६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पाचव्या सत्रातील आयोजित उद्योग उभारणी, रोजगार निर्मिती या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या अभ्यासू शैलीतून उपस्थितांशी संवाद साधला. सिमेंट उद्योग, आॅटोमोबाईल, कार, मोटारसायकल, ईलेक्ट्रीकल या सारखे विषय अभ्यासक्रमात असले पाहिजे. म्हणजे विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार पुढील दहा वर्षात उच्च शिक्षण घेवून तयार होईल असे उदय देशमुख यांनी सांगितले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांनी नेमके काय करावे, याचे नियोेजन असले पाहिजे. प्रथमत: आयआयटीसारख्या मोठ्या कंपनीत नोकरी करायची आहे, ही अपेक्षा न ठेवता छोट्या कंपनीत आधी संधी म्हणून नोकरी स्वीकारावी. तरुणांना प्रॅक्टिकल ज्ञान नसल्याने मोठ्या कंपनीत त्यांची फसगत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी कमी वेतनात नोकरी केल्यास पुढे मोठ्या कंपनीत आपल्याला संधी चालून येईल, असा विश्वास त्यांनी दिला.
तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता जास्तीत जास्त उद्योग उभारणी क्षेत्रात सुद्धा येऊन इतरांसाठी रोजगार निर्मिती करावी. महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रात यावे, असे आवाहन उदय देशमुख यांनी केले.
या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रदेश कार्याध्यक्ष माधुरी भदाण होत्या. यावेळी व्यासपीठावर अष्ठविनायक एनर्जी इन्फ्रा प्रा. लि. एम.डी. मिलिंद देशमुख, अनिता वानखडे, रेखा गुडधे, विजया झोंबाडे, शोभना देशमुख, अर्चना सवई, जया हिवसे, प्राचार्य मंगला देशमुख, प्राचार्य अंजली ठाकरे कल्पना देशमुख, प्रिती देशमुख, गायत्री देशमुख, वैशाली कोहळे आदींची उपस्थिती होती. मनाली तायडे यांनी भूमिका विषद केली. संचालन सीमा देशमुख यांनी तर आभार प्रतिभा रोडे यांनी मानले.
 

Web Title: Changes in education system need to be made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.