कोरोनाबाधित रुग्णांच्या नोंद प्रक्रियेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:17 AM2021-08-28T04:17:30+5:302021-08-28T04:17:30+5:30
अमरावती ; कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्याच्या प्रक्रियेत काही बदल झाले आहेत.याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यत एखादी व्यक्ती ...
अमरावती ; कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्याच्या प्रक्रियेत काही बदल झाले आहेत.याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यत एखादी व्यक्ती इतर जिल्ह्यातील रहिवाशी असली तरीही तिची चाचणी ज्या जिल्ह्यात होऊन पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, तिथेच तिची रुग्ण म्हणून नोंद होत होती.परंतु आता रुग्ण ज्या जिल्ह्यातील आहे, त्यानुसार त्याची नोंद मूळ जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात येत आहे.त्यामुळे इतर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या व अमरावती जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या नोंदी वगळण्यात आल्या आहेत. त्यानुसार आजपावेतो अमरावती जिल्ह्यातील रुग्णांची सुधारित आकडेवारी ९६ हजार ५२ अशी आहे. माहिती अद्ययावतीकरणाची ही प्रक्रिया सर्व जिल्ह्यांत होत असल्याचे कोविड रिपोर्टिंग सेंटरतर्फे सांगण्यात आले.यापूर्वीच्या प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील कालची एकूण आकडेवारी ९६ हजार ६५५ होती.२७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात ११ नवे बाधित आढळले. त्यानुसार एकूण आकडेवारी ९६ हजार ६६६ झाली. या आकडेवारीतून इतर जिल्ह्यातील आज ६१४ नोंदी वगळल्या. त्यामुळे सुधारित आकडेवारी ९६ हजार ५२ इतकी आहे.