सर्व्हर डाऊन, तलाठी परीक्षा केंद्रावर गोंधळ; एक तास उशीरा सुरु झाली परीक्षा

By उज्वल भालेकर | Published: August 21, 2023 12:43 PM2023-08-21T12:43:30+5:302023-08-21T12:44:33+5:30

परीक्षार्थींना मनस्ताप, संतप्त प्रतिक्रिया

chaos at Talathi exam centre in Amravati as Server disrupted, exam started an hour late | सर्व्हर डाऊन, तलाठी परीक्षा केंद्रावर गोंधळ; एक तास उशीरा सुरु झाली परीक्षा

सर्व्हर डाऊन, तलाठी परीक्षा केंद्रावर गोंधळ; एक तास उशीरा सुरु झाली परीक्षा

googlenewsNext

अमरावती : राज्यभरात तलाठी भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षा सुरु आहे. परंतु अमरावतीमध्ये सोमवारी या परीक्षेच्या दरम्यान परीक्षार्थींची चांगलाच गोंधळ उडाला. सकाही ९ ते ११ या परीक्षेची वेळ असताना देखील सर्व्हर डाऊनमुळे वेळेत परीक्षा सुरु होऊ शकली नाही. शहरातील सिटीलँड तसेच तक्षशिला पॉलिटेक्निक कॉलेज या दोन केंद्रावर सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा वेळेत सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे परीक्षार्थींनी मनस्ताप व्यक्त केला.

राज्यातील ४ हजार ६४४ तलाठींच्या रीक्तपदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या परीक्षेसाठी राज्यात तब्बल १० लाख ४१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीमध्ये रोज तीन सत्रामध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. अमरावती शहरात आठ केंद्रावर ही परीक्षा होत आहे. सोमवारी मात्र पहिल्याच सकाळच्या ९ ते ११ या परीक्षा सत्रामध्ये परीक्षार्थींचा चांगलाच गोंधळ उडाला.

शहरातील सीटीलँड आणि तक्षशीला पॉलिटेक्निक कॉलेज या दोन केंद्रावर परीक्षार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पेाहचल्यानंतरही सर्व्हर डाऊनमुळे वेळेत परीक्षाच सुरु झाली नाही. तर इतर केंद्रावर मात्र परीक्षा सुरु झाली. त्यामुळे परीक्षार्थींना परीक्षेची वेळ होऊन देखील परीक्षा केंद्राबाहेरच थांबवे लागले. तब्बल एक तासाने तांत्रिक बिघाड दुर झाल्यानंतर परीक्षा सुरळीत सुरु झाली. परंतु पहिल्याच सत्रात झालेल्या या गोंधळाच्या परिस्थितीमुळे इतर सत्रामधील परीक्षेचे नियोजनही बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षा घेणाऱ्या कंपनीविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: chaos at Talathi exam centre in Amravati as Server disrupted, exam started an hour late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.