चारचाकी उलटली, सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:08 PM2018-05-06T23:08:53+5:302018-05-06T23:08:53+5:30
नजिकच्या धनोडी येथून विवाह सोहळा आटोपून पांढुर्णाकडे परतताना वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने तवेरा गाडीने चार ते पाचदा कोलांट्या घेतल्या. यात चालकांसह वाहनातील सर्व प्रवाशी जखमी झाले असून, ही घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : नजिकच्या धनोडी येथून विवाह सोहळा आटोपून पांढुर्णाकडे परतताना वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने तवेरा गाडीने चार ते पाचदा कोलांट्या घेतल्या. यात चालकांसह वाहनातील सर्व प्रवाशी जखमी झाले असून, ही घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
लग्नाचे वऱ्हाड वाहनाला झालेला अपघातातील जखमी नावे शेषराव सैयाजी मरस्कोल्हे, ललिता शेषराव मरस्कोल्हे, रेशमा शेषराव मरस्कोल्हे, सुरेश उईके, शीतल सुरेश उईके, सुशिला सुरेश उईके सर्व रा. नांदनवाडी, पांढूर्णा मध्यप्रदेश असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, धनोडी येथील पवार यांचे मुलीच्या लग्नात सहभागी होण्याकरिता वरपक्षाकडून आलेल्या टवेरा गाडी क्र. एम.एच १४ डीटी ७३५४ ने परतीच्या प्रवासात निघाले होते. मात्र, चालकाने भरधाव वाहन चालविल्याने ते अनियंत्रित झाले. यात गाडीने चार ते पाच कोलांट्या घेतल्या. जखमींना पांढुर्णा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास चालविला आहे. वरुड तालुक्यातील धनोडी येथे सकाळी १० वाजता वऱ्हाडी आले होते. धनोडी येथे पूनाजी पवार यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता. लग्न आटोपून पांढुर्णा येथे जात असताना महेंद्री विश्रामगृहानजिक हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला जावून चार ते पाच कोलांट्या वाहनाने घेतल्या. सर्व जखमींना नागरीकांनी तातडीने जवळील पांढूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.