लग्नाचे आमिष दाखवून विधवेचे शोषण, नंतर नकार; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 12:57 PM2022-02-17T12:57:54+5:302022-02-17T13:18:31+5:30

२०१८ मध्ये आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरदेखील त्याने वारंवार शोषण केले. तिने आरोपीला दीड लाख रुपये उधार दिले. काही दिवसांनंतर तिने आरोपीस लग्नाबद्दल विचारले असता, त्याने टाळाटाळ केली.

charges filed against man for sexual harassment of a widow showing lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून विधवेचे शोषण, नंतर नकार; गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून विधवेचे शोषण, नंतर नकार; गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देबळजबरीने शरीरसंबंधना विवाह केला, ना दीड लाख परत केले!

अमरावती : लग्न करेल म्हणून ज्याच्यावर विश्वास ठेवला, वारंवार त्याची शारीरिक बळजबरीदेखील सहन केली. त्यानेच कार्यभाग उरकल्यानंतर ‘तो मी नव्हेच’चा पवित्रा घेऊन नामानिराळा होण्याचा प्रयत्न केल्याने एका महिलेला पोलीस ठाणे गाठावे लागले. त्याने लग्नास नकार देऊन घेतलेले दीड लाख रुपये परत देण्यास नकार दिला. कशाचे पैसे, अशी विचारणा करून तिलाच मारहाण केली. एका महिलेनेदेखील त्याला सहकार्य केले. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी अश्विन पवार व एका महिलेविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी दुपारी गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, २० फेब्रुवारी २०१८ ते ३१ जानेवारी २०२२ दरम्यान ते प्रसंग आपल्यासोबत घडल्याची तक्रार त्या महिलेने नोंदविली आहे. यातील आरोपी अश्विन व फिर्यादी महिला एकाच मोहल्ल्यातील रहिवासी असल्याने ते परस्परांना ओळखत होते. सन २००९ मध्ये फिर्यादीचे लग्न झाले. पतीपासून तिला दोन मुले आहेत. सन २०१८ साली तिचे पती मरण पावले. तेव्हापासून अश्विनची तिच्या घरी ये-जा सुरू झाली. सन २०१९ च्या जानेवारी महिन्यात अश्विनने मी तुझ्याशी लग्न करेन, तुझ्या आणि तुझ्या मुलांचा सांभाळ करेन, असे म्हणत तिला प्रपोज केले. तिलादेखील आधाराची गरज असल्याने तिने प्रेमाचा स्वीकार केला. जानेवारी २०१८ मध्ये आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरदेखील त्याने वारंवार शोषण केले. तिने आरोपीला दीड लाख रुपये उधार दिले. काही दिवसांनंतर तिने आरोपीस लग्नाबद्दल विचारले असता, त्याने टाळाटाळ केली.

आरोपी दडला होता पलंगाखाली

लग्न केव्हा करतोस, अशी विचारणा करण्यासाठी फिर्यादी महिला २८ जानेवारी रोजी अश्विनच्या घरी गेली. त्यावेळी एका महिलेने तो घरी नसल्याचे सांगितले. परंतु अश्विनची दुचाकी व चप्पल घरात दिसल्याने ती घरात शिरली. आत डोकावले असता तो पलंगाखाली लपलेला दिसला. पीडितेने त्याला ओढून पलंगाबाहेर काढले. उधारीच्या पैशाबाबत विचारपूस केली. त्यावेळी येथे कशाला आली? कशाचे पैेसे? असे म्हणून तिला शिवीगाळ केली. तेथील महिलेने अश्विनसोबत संबंध कशाला ठेवले, असे म्हणत शिवीगाळ केली व पाहून घेण्याची धमकी दिली. यावेळी दोघांनीही तिला थापडा-बुक्क्यांनी मारहाण केली. अखेर आरोपीने लग्नाचे आश्वासन न पाळता आपले शारीरिक शोषण केल्याची तक्रार पीडितेने नोंदविली.

Web Title: charges filed against man for sexual harassment of a widow showing lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.