चव्हाणांनी आश्रमात का ओतला पैसा?

By Admin | Published: September 27, 2016 12:09 AM2016-09-27T00:09:14+5:302016-09-27T00:09:14+5:30

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमाचा आज जो कायापालट झाला आहे,...

Chavan poured money into the ashram? | चव्हाणांनी आश्रमात का ओतला पैसा?

चव्हाणांनी आश्रमात का ओतला पैसा?

googlenewsNext

परतावा काय? : आणखी कुठे गुंतवणूक?
अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमाचा आज जो कायापालट झाला आहे, त्यात दादा चव्हाण यांचा मोठा वाटा आहे, असे त्यांचे पुत्र सिद्धेश्वर चव्हाण हे जाहीरपणे बोलत असतात. प्रश्न असा उपस्थित होतो की, पुण्यात वस्तव्य असताना दादा चव्हाणांनी पिंपळखुट्याच्या आश्रमात कोट्यवधी रुपये दान केलेत ते कशासाठी?
शंकर महाराज यांच्या आश्रमाचे सुरुवातीचे रूप झोपडीसमान आहे. सामान्यांना बघण्यासाठी त्यासंबंधिची छायाचित्रे त्यांच्याच पुस्तकांमध्ये उपलब्ध आहेत. भक्तांनी दिलेल्या दानातून आश्रमाला भव्यता प्राप्त झाली, असे आश्रमातूनही सांगितले जाते. दान देणाऱ्या अनेक भक्तांपैकी दादा चव्हाण या नावाचा उल्लेख विशेषत्त्वाने होतो. आश्रमाच्या निर्माणकार्यापैकी ७० टक्के बांधकाम दादा चव्हाण यांनी करविले, असे त्यांचाच मुलगा वारंवार सांगतो. आम्ही पैसा लावला म्हणून आजचा हा भव्य आश्रम उभा आहे, आताच्या मंडळींमध्ये ती ताकद कुठे? या आशयाची वक्तव्ये सिद्धेश्वर चव्हाण यांच्याकडून अनेकदा करण्यात आलीत. दादा चव्हाणांनी हा विकास करविला ते कुठल्यातरी ध्येयापायी. ते ध्येय कोणते? त्यांना आश्रमाची ही अफलातून ओढ कशासाठी? काय साध्य करावयाचे होते त्यांना? त्यांची ओढ केवळ भक्तीशी संबंधित असेल तर भक्तीरसात आकंठ डुंबणे, यापर्यंतच ती मर्यादित का राहिली नाही? त्यात अर्थकारण आले ते कशासाठी? पिंपळखुट्यातील लोकांचे डोळे विस्फारले जावेत, अशा बड्या रकमा आश्रमात कशासाठी खर्च करण्यात आल्यात? कुणाच्या सांगण्यावरून हा खर्च करण्यात आला? आश्रमात केलेल्या या खर्चातून दादा चव्हाण यांना काय परतावा मिळणार होता, असे अनेक सवाल उपस्थित होतात.
दादा चव्हाणांना आश्रमातून काढून टाकण्यात आले त्यावेळी त्यांनी केलेल्या खर्चाबाबत कुणीच का सहृदयता दाखविली नाही? आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी हे आजदेखील चव्हाणांविरुद्ध बोलतात त्यावेळी त्यांनी आश्रमाला केलेली आर्थिक मदत त्यांची जिव्हा अडखळवत नाही.
आश्रमात भरमसाठ पैसा ओतूनही दादा चव्हाण यांना नको त्या पद्धतीने रवाना करण्यात आले, यातच मोठे गमक दडले आहे. आश्रमाने चव्हाणांना दिलेली आश्चर्यकारक वागणूक आणि आता नरबळी प्रकरणाच्या अनुषंगाने चव्हाणांच्या नावाचा आश्रमाकडूनच झालेला उल्लेख, या बाबींचा परस्पर संबंध जुळतो काय, हे पोलिसांना विषय तपासपटलावर घेतल्यावर योग्य तऱ्हेने कळू शकेल.
दादा चव्हाण यांच्यावर मोठ्या रकमांच्या व्यवहारांची जबाबदारी आश्रमाकडून सोपविली जायची. चव्हाण यांनी अशा कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात? आश्रमासाठी त्यांनी आणखी कुठे संपत्ती खरेदी केली, याची गुपिते पोलीस आणि प्राप्तीकर विभागाने उलगडल्यास बरीच तत्थ्ये बाहेर येतील.

Web Title: Chavan poured money into the ashram?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.