स्वस्त धान्य दुकानदार पाल्यांवर अवलंबून

By admin | Published: July 10, 2017 12:10 AM2017-07-10T00:10:34+5:302017-07-10T00:10:34+5:30

प्राधान्य, बीपीएल व अंत्योदय योजनेतील स्वस्त धान्य लार्भार्थ्यांच्या ‘ई-स्पोस’ मशिनच्या माध्यमातून नोंदी घेण्याचा उपक्रम शासनाने सुरू के ला आहे.

Cheap food shopkeeper depends on the kids | स्वस्त धान्य दुकानदार पाल्यांवर अवलंबून

स्वस्त धान्य दुकानदार पाल्यांवर अवलंबून

Next

‘ई-स्पोस’ मशिनचा गोंधळ : संचालकांना तंत्रज्ञानाचा गंधच नाही
सचिन मानकर । लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : प्राधान्य, बीपीएल व अंत्योदय योजनेतील स्वस्त धान्य लार्भार्थ्यांच्या ‘ई-स्पोस’ मशिनच्या माध्यमातून नोंदी घेण्याचा उपक्रम शासनाने सुरू के ला आहे. यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. मात्र, ‘ई-स्पॉस’ मशिन हाताळता येत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे यामशिनचा वापर करण्यासाठी तंत्रज्ञान अवगत असलेल्या पाल्यांची मदत घ्यावी आहे.
‘ई-स्पॉस’ मशिनचा वापर करण्याचा उपक्रम शासनाने मागील मार्च महिन्यापासून सुरू केला आहे. त्याकरिता लाभार्थ्यांचे आधार लिकिंग सुद्धा करण्यात आले आहे. परंतु, वयोवृद्ध तसेच टेक्नोसॅव्ही नसणाऱ्या डिलर्सची पंचाईत होत आहे. या मशिनचे अनेकांना अद्यापही प्रशिक्षण देण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी दर्यापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात लोतवाडा गावातील एक स्वस्त धान्य दुकानदार ‘ई-स्पोस’ मशिन घेऊन ते अपडेट करण्यासाठी आले. मात्र, त्यांना मशिन हाताळता येत नसल्याने त्यांनी त्यांच्या नातवाला सोबत आणले होते. त्याने अँड्रॉईड हाताळावा, तशी ही मशिन हाताळून काही लाभार्थ्यांचे नाव व त्यांचे १२ अंकी आरसी कोड मशिनमध्ये अपलोड केले. यामुळे ‘ई-स्पॉस’ मशिन चालविताना रेशन दुकानदारांना अडचण होत असल्याचे उघडकीस आले आहे. मशिन हाताळण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण डिलर्सला देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अन्यथा या मशिन्सचा योग्य पद्धतीने उपयोग केला जाऊ शकरणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.

यंत्रणा ठरणार कुचकामी
तालुक्यातील १४४ स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाच्यावतीने या मशिन देण्यात आल्या आहेत. यातूनच लाभार्थ्यांना किती स्वस्त धान्य दिले, याची नोंद होऊन यातूनच त्यांना धान्य मिळाल्याची पावती सुद्धा त्वरित देण्यात येते. यामशिनचे लिंक तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी जोडण्यात आले आहे. यामुळे रेशनमध्ये होणाऱ्या गैरव्यवहराला आळा बसणार होता. मात्र, मशिन हाताळता येत नसल्याने ही यंत्रणा कुचकामी ठरू शकते.

तपासणीला
मदत होणार कशी ?
तालुका पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य विक्रेत्यांची तपासणी केली जाते. ई-स्पॉस मशिनच्या माध्यमातून व्यवहार झाल्यास ते तपासण्यात फारसा वेळ खर्च होणार नाही. यात वेळेची बचतही होईल. मात्र, यासाठी आवश्यक माहिती दिली गेली नसल्याने याचा फायदा होणार तरी कसा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मार्च महिन्यापासून शासनाने स्वस्त धान्य डिलरला ‘ई-स्पोस’ मशिन देण्यात आल्या आहेत. यामुळे लाभार्थ्यांना त्याचा फायदा होतो. केवळ एकदा यासंदर्भातील प्रशिक्षण अमरावतीला झाले होते.
- रामप्रसाद डोळे
पुरवठा विभाग, दर्यापूर

Web Title: Cheap food shopkeeper depends on the kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.