भूमिहिनांनाही मिळतोय स्वस्त धान्याचा लाभ

By admin | Published: March 23, 2016 12:31 AM2016-03-23T00:31:10+5:302016-03-23T00:31:10+5:30

शासकीय कार्यालयात कामाची पूर्तता करायची झाल्यास फार मन:स्ताप होतो.

Cheap foodgrain benefits to landless people | भूमिहिनांनाही मिळतोय स्वस्त धान्याचा लाभ

भूमिहिनांनाही मिळतोय स्वस्त धान्याचा लाभ

Next

नांदगाव खंडेश्वर तालुका : ११ हजार ४३० कुटुंबांना लाभ
नांदगाव खंडेश्वर : शासकीय कार्यालयात कामाची पूर्तता करायची झाल्यास फार मन:स्ताप होतो. तेवढ्याच प्रमाणात शासकीय कर्मचाऱ्यांचा कामकाजातील ढिसाळपणाही कारणीभूत ठरतो. पण जर एखाद्या अधिकाऱ्याने मनावर घेतले तर शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येते. याचा प्रत्यय तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातून दिसून येत आहे.
येथील पुरवठा निरीक्षक गजानन मेंडेकर यांनी संपूर्ण तालुका पिंजूूूूूून काढत तालुक्यातील १८३० भूमिहिन व ९,६०० केसरी एपीएल कार्डधारक शेतकऱ्यांना स्वस्त धान्याचा लाभ मिळविण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे नापिकीने हतबल झालेले शेतकरी कुटुंब व भूमिहिन कुुटंब असे एकूण ११,४३० कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ मिळाला आहे.
प्रत्येक शासकीय कार्यालयात कुटुंबाची ओळख म्हणून एपीएल, बीपीएल अंत्योदय अशा कार्डाचा वापर केल्या जातो. परंतु यामध्ये एपीएल केसरी कार्डधारकांना शासकीय योजनांचा लाभ न मिळता फक्त शासकीय कामकाजासाठीच केसरी कार्डाचा उपयोग होत होता. त्यामुळे शासनाचे सन २०१५ आॅगस्टमध्ये शेतकरी कुटुंबासाठी शेतकरी कुटुंब कार्ड असलेल्या भूमिहीन कुटुंबासाठी जानेवारी २०१६ अन्न सुरक्षा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. अनेकदा शासनाने कुठलीही योजना राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर शासकीय कामकाजातील दिरंगाईपणामुळे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. परंतु येथील पुरवठा विभागाने मात्र शेतकरी कुटुंबासाठी सुरू झालेल्या शेतकरी लाभार्थी योजनेंतर्गत अवघ्या सहा महिन्यापूर्वी पुरवठा निरीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतलेल्या गजानन भेंडेकर यांच्या पुढाकाराने प्रभावीपणे शासकीय योजनेची अंमलबजावणी करुन शेतकरी कुटुंबांना व भूमिहिन कुटुंबांना लाभ मिळावा, यासाठी नांदगाव तालुक्यातील एपीएल कार्डधारक शेतकरी कुटुंब व भूमिहीन कुटुंब यांचा शोध घे एकूण ११,४३० कुटुंबांना अन्न सुरक्षा योजना व शेतकरी कुटुंब लाभार्थी योजनेचा लाभ मिळवून दिला. असेच कार्य इतरही विभागातील कर्मचाऱ्यांनी करावे जेणेकरून जनसामान्यांची कामे लवकर होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळावा, अशी अपेक्षा आहे. तालुक्यातील ११,४३० कुटुंबांना शेतकरी कुटुंब लाभार्थी योजना व अन्न सुरक्षा योजनेचा तत्पर लाभ मिळवून देताना जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात व पुरवठा विभागातील सहकारी यांच्या सहकार्याने शेतकरी कुटुंब व भूमिहीन कुुटुंबांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊ.
- गजानन भेंडेकर,
तालुका पुरवठा निरीक्षक

Web Title: Cheap foodgrain benefits to landless people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.