जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक
By admin | Published: January 28, 2015 11:06 PM2015-01-28T23:06:48+5:302015-01-28T23:06:48+5:30
शंभर रुपयांत एक लाखाचा विमा, असे आमिष दाखवून तिवसा तालुक्यातील पालवाडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने शेकडो नागरिकांना लाखो रुपयांनी गंडविले. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट
योजनाच नाही अस्तित्वात : राजीव गांधी ग्राम विमा योजना
तिवसा : शंभर रुपयांत एक लाखाचा विमा, असे आमिष दाखवून तिवसा तालुक्यातील पालवाडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने शेकडो नागरिकांना लाखो रुपयांनी गंडविले. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करून अस्तित्वात नसलेल्या राजीव गांधी ग्राम विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवित अमरावती येथील सूत्रधाराच्या इशाऱ्यावर त्याने ही फसवणूक केली. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी दोघांना बुधवारी अटक केली.
पालवाडीनजीकच्या भांबोरा, अमदाबाद गावातही राजीव गांधी ग्राम विमा योजना व जीवनदायी ग्राम विमा योजना, गट विभाग 'अ'च्या नावाने राजीव गांधी यांचा फोटो, एलआयसी या कंपनीचा लोगो व जिल्हाधिकारी राजीव गांधी ग्राम विमा नावाने नागरिकांकडून अर्ज भरलेत व त्यांना १०० रुपयांच्या पावत्या दिल्या, पावतीवर शासन राजमुद्रा, महाराष्ट्र शासन, राजीव गांधी ग्राम विमा योजना महाराष्ट्र स्टेट गव्हर्मंेट असे इंग्रजीमध्ये अंकित आहे. ग्राम सर्व्हे अधिकारी राजीव गांधी ग्राम विमा या नावाची मोहोर पावतीवर लावण्यात आली.