अपंग बालकांची तपासणी

By admin | Published: April 4, 2017 12:25 AM2017-04-04T00:25:15+5:302017-04-04T00:25:15+5:30

येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मुबंई येथील तज्ज्ञ डॉक्टरांनकडून अपंग बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे ...

Check for disabled children | अपंग बालकांची तपासणी

अपंग बालकांची तपासणी

Next

२५१ रुग्णांची तपासणी : सुपर स्पेशालिटीमध्ये शिबिर
अमरावती : येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मुबंई येथील तज्ज्ञ डॉक्टरांनकडून अपंग बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ३१ मार्च व १ एप्रिल रोजी येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये ० ते १८ वयोगटातील एकूण २५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
सदर शिबिरात मुंबई येथील न्युरोजेन ब्रेन स्पाईन इन्स्टीट्युटेच्या तज्ज्ञांव्दारे २५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. न्यरोजेन ब्रेन अ‍ॅन्ड स्पाईन इनस्टीट्युट संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टर नदीनी गोकुलचंद्रन यांनी यांनी रुग्णांची तपासणी केली. व उपस्थित पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारची उपचार पद्धतीही येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात आरोग्य मंत्र्यांनी पुढाकार घेऊन सुरू करावी, असा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
या शिबिरात सुशील कासेकर कीर्ती लाड, रोहित दास, वैशाली गणविर आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी न्यरोजेन संस्थेच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या गीता अरोरा, राजेंद्र पटोळे, किरण पवार आदी डॉक्टरांनी रुग्णांना विविध आजारासंदर्भात समुपदेशन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिक्षक श्यामसुंदर निकम यांनी केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव, मनोविकारतज्ज्ञ अमोल गुल्हाने आदी उपस्थित होते.

Web Title: Check for disabled children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.