बियाण्यांची उगवण क्षमता तपासा
By admin | Published: June 28, 2014 12:25 AM2014-06-28T00:25:51+5:302014-06-28T00:25:51+5:30
शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी उगवण क्षमता तपासणीचे आवाहन राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले
धामणगाव (रेल्वे) : शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी उगवण क्षमता तपासणीचे आवाहन राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे़सोयाबीन बियाण्याच्या पेरणीबाबतची सर्व मार्गदर्शक सूचना कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी दिलीप ठाकरे यांनी दिल्या आहेत़
खरीप हंगामाला सुरूवात झाली असली तरी गेल्या एक महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यासोबतच कृषी विभागाचीही चिंता वाढली आहे़ त्यामुळे बियाणे पेरतांना काळजी घेण्याचे कृषी विभागाने पत्र जारी केले आहे़ सोयाबीन बियाण्याची पेरणी तीन ते चार सेमी खोलीपर्यंत करावी बियाणे हाताळताना काय काळजी घ्यावी बियाण्यातील आद्रतेचे प्रमाण १० ते १२ टक््के नसावे, बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे खरेदीचे पावती घ्यावी बियाणे पिशवी व त्याला असलेले लेबल, खरेदी पावती पीक काढणी होईपर्यत जपून ठेवावी, पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बूरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी शेतकऱ्यांनी पिकाचा कालावधी व वाण याचा विचार करून वाण निवडावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिलीप ठाकरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून केले आहे़ (तालुका प्रतिनिधी)