‘रघुवीर’ प्रतिष्ठानची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:08 AM2017-11-29T00:08:40+5:302017-11-29T00:09:08+5:30

रघुवीर मिठाईयामधील विकत आणलेल्या मोतीचूर लाडूत काचेचा तुकडा निघाल्याप्रकरणी.....

Checking of 'Raghuveer' establishment | ‘रघुवीर’ प्रतिष्ठानची तपासणी

‘रघुवीर’ प्रतिष्ठानची तपासणी

Next
ठळक मुद्देएफडीएची धाड : नमुने जप्त, नोटीस बजावणार

आॅनलाईन लोकमत
अमरावती : रघुवीर मिठाईयामधील विकत आणलेल्या मोतीचूर लाडूत काचेचा तुकडा निघाल्याप्रकरणी सोमवारी सायंकाळी अन्न व प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी श्याम चौकातील रघुवीर मिठाईया मध्ये जाऊन खाद्यपदार्थांची तपासणी केली. एका लाडूचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी पाठविले आहे.
यावेळी रघुवीरच्या सातुर्णा येथे खाद्यपदार्थ तयार करण्याचा कारखाना आहे. तेथे स्वच्छता व खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा मानदे कायद्यनुसार नियम पाळल्या जाते की नाही, हे ही तपासण्यात आली. रघुवीर मिठाईयाचे मालक चंद्रकात पोपट यांना अन्न व प्रशासन विभागाचे सह. आयुक्त सुरेश अन्नपुरे सुधारणा नोटीस बजावणार आहे. जप्त केलेले नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले आहे. रघुवीरच्या कचोरीत यापूर्वीसुद्धा तळलेली अळी निघाली होती. तेव्हा रघुवीरच्या स्विटमार्टवर एफडीएने धाड टाकून तपासणी केली. रघुवीरच्या मालकाला नोटीस बजाविण्यात आली होती हे विशेष!
विहार कॉलनीस्थित सतीश विठ्ठलराव देशमुख यांनी २५ नोव्हेंबर रोजी शनिवारी सकाळी श्याम चौकातील रघुवीर मिठाईयामधून घेतलेल्या मोतीचूरच्या लाडूत काचेचा तुकडा निघाला. याची तक्रार देशमुख व त्यांच्या मित्रमंडळीनी एफडीएकडे सोमवारी केली होती. ग्राहक व तक्रारकर्ता सतीश देशमुख यांच्या पत्नी प्रेमिला देशमुख कुटुंबासमवेत अंबादेवी मंदिरात गेल्या असता लाडूत काचाचा तुकडा आढळल्याने होता. याप्रकरणी सह आयुक्त सुरेश अन्नपुरे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले होते. जिल्हाधिकारी बांगर यांनाही निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.
ठाण्यातील नमुनेही घेतले ताब्यात
सतीश देशमुख यांनी विकत घेतलेल्या लाडूत काचेचा तुकडा निघाल्यानंतर त्यांनी सिटी कोतवालीत सदर लाडू व काचेचा तुकडा पोलिसांना दिला होता. तक्रारही नोंदविली होती. परंतु सदर प्रकरण अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकारात येत असल्याने पोलिसांनी सदर प्रकरण एफडीएकडे वळते केले. सोमवारी सायंकाळी सिटी कोतवाली ठाण्यातील सदर लाडूचे नमुने व काचाचा तुकडा अन्न सुरक्षा अधिकारी भाऊराव वाकडे, व विश्वजित शिंदे यांनी जप्त करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे.

श्याम चौकातील रघुवीर प्रतिष्ठानची व सातुर्णा येथील कारखान्याची तपासणी केली. लाडूचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविणार असून रघुवीरच्या मालकाला सुधारणा नोटीस पाठविण्यात येणार आहे.
- सुरेश अन्नपुरे, सह. आयुक्त अन्न व प्रशासन विभाग

Web Title: Checking of 'Raghuveer' establishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.