शाळा, अंगणवाडीतील पाण्याच्या स्रोताची रासायनिक तपासणी; १५ जुलैपर्यंतची डेडलाइन 

By जितेंद्र दखने | Published: July 4, 2023 07:14 PM2023-07-04T19:14:38+5:302023-07-04T19:14:51+5:30

आतापर्यंत जिल्ह्यातील १५७४ शाळा व १८६१ अंगणवाड्यांमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठविले आहेत.

Chemical testing of water source in school, Anganwadi Deadline till 15 July | शाळा, अंगणवाडीतील पाण्याच्या स्रोताची रासायनिक तपासणी; १५ जुलैपर्यंतची डेडलाइन 

शाळा, अंगणवाडीतील पाण्याच्या स्रोताची रासायनिक तपासणी; १५ जुलैपर्यंतची डेडलाइन 

googlenewsNext

अमरावती : शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदमार्फत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यातील पिण्याच्या पाण्याच्या पाणी स्रोताचे नमुने तपासणी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच करण्यात येते. यासाठी १ जून ते ३० जून या कालावधीत सर्व गावे, शाळा, अंगणवाड्यांमधील पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी केल्या जाते. आतापर्यंत जिल्ह्यातील १५७४ शाळा व १८६१ अंगणवाड्यांमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठविले आहेत.

 झेडपी सीईओ अविष्यांत पंडा यांच्या आदेशावरून व जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग प्रमुख श्रीराम कुळकर्णी यांच्या निर्देशानुसार येत्या १५ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. १४ तालुक्यात एकूण २५९८ अंगणवाड्या, १५८६ शाळा आहेत. या ठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाणी तपासणीसाठी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या नमुने तपासणीची प्रक्रिया ७१ टक्क्यांपेक्षा जास्त झाली असून येत्या काही दिवसात शंभर टक्के तपासणी होणार आहे. यासाठी १५ जुलैची डेडलाइन दिली आहे.
 
दुसऱ्या टप्प्यात जैविक तपासणी
या रासायनिक तपासणीचे अहवाल प्राप्त होताच दूषित आढळून आलेल्या पाणीपुरवठा स्रोतांचे शुद्धीकरण केल्या जाणार आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणीची प्रक्रिया आटोपताच पाण्याची जैविक तपासणी सुरू होईल. विद्यार्थ्यांसह जिल्हाभरातील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागा मार्फत ही तपासणी मोहीम सुरू असल्याचे जलतज्ज्ञ नीलिमा इंगळे यांनी दिली.
 

Web Title: Chemical testing of water source in school, Anganwadi Deadline till 15 July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.