चेतन गावंडे महापौर, कुसूम साहू उपमहापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:00 AM2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:54+5:30

१० मिनीटांच्या अवधीत युवा स्वाभिमानच्या सुमती ढोके, शिवसेनेचे राजेंद्र तायडे, बसपाचे चेतन पवार, एमआयएमचे अब्दूल नाजीम अब्दूल रऊफ यांनी उमपौरपदाचे अर्ज मागे घेतले. कुसूम साहू यांचा एक अर्ज बाद झाला. या पदासाठीही हात उंचावून मतदान करण्यात आले. यामध्ये बसपाच्या इसरत बानो मन्नान खान यांना बसपाचे पाच, एमआयएमचे मो. साबीर मो. नासीर यांना काँग्रेस व एमआयएमची २३ मते मिळालीत.

Chetan Gawande Mayor, Kusum Sahu Deputy Mayor | चेतन गावंडे महापौर, कुसूम साहू उपमहापौर

चेतन गावंडे महापौर, कुसूम साहू उपमहापौर

Next
ठळक मुद्देभाजपची बाजी : शिवसेना तटस्थ, महाशिवआघाडी फिस्कटली, ‘गेम प्लॅन’ हुकला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहराच्या १६ व्या महापौरपदी भाजपचे चेतन गावंडे व उपमहापौरपदी कुसूम साहू विजयी झाल्या. एमआयएम तसेच बसपाचे उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीत महाशिवआघाडीचा प्रयोग फसल्याने काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. शिवसेना तटस्थ, तर तीन सदस्य अनुपस्थित राहिलेत.
पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला पीठासीन अधिकाऱ्यांनी महापौरपदासाठी सहा सदस्यांची नावे वाचून दाखवित उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १० मिनिटांचा अवधी दिला. या कालावधीत विलास, इंगोले, प्रदीप हिवसे यांनी माघार घेतल्याने बसपाच्या माला देवकर, भाजपचे चेतन गावंडे व एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन हे तीन उमेदवार कायम राहिलेत. पीठासीन अधिकाऱ्यांनी मराठी वर्णाक्षरानुसार उमेदवारांची नावे उच्चारून हात उंचावून मतदान करण्याचे आवाहन केले. यामध्ये एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना २३ मते पडली. त्यांना एमआयएम व काँग्रेसच्या सदस्यांनी मतदान केले. बसपाच्या माला देवकर यांना त्यांच्या पक्षाचे पाच मतदान मिळाले, तर चेतन गावंडे यांना भाजपचे ४५, युवा स्वाभिमानचे ३ व रिपाइंचे एक असे ४९ मते मिळाल्याने जिल्हाधिकाºयांनी त्यांना विजयी घोषित केले. यावेळी भाजप सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. सभेला प्रभाग १३ च्या सदस्य स्वाती कुळकर्णी व्हिलचेअरवर उपस्थित होत्या. दरम्यान महापालिकेत भाजपा पदाधिकारी व कार्यकत्यांनी ढोल ताशाच्या निनादात व आतषबाजी करीत विजयाचा जल्लोष केला. याच पद्धतीने उपमहापौरपद निवडीची प्रक्रिया पार पडली. या पदासाठी सात उमेदवारांचे आठ अर्ज होते. १० मिनीटांच्या अवधीत युवा स्वाभिमानच्या सुमती ढोके, शिवसेनेचे राजेंद्र तायडे, बसपाचे चेतन पवार, एमआयएमचे अब्दूल नाजीम अब्दूल रऊफ यांनी उमपौरपदाचे अर्ज मागे घेतले. कुसूम साहू यांचा एक अर्ज बाद झाला. या पदासाठीही हात उंचावून मतदान करण्यात आले. यामध्ये बसपाच्या इसरत बानो मन्नान खान यांना बसपाचे पाच, एमआयएमचे मो. साबीर मो. नासीर यांना काँग्रेस व एमआयएमची २३ मते मिळालीत. भाजपच्या कुसूम साहू यांना भाजप व मित्रपक्षाचे असे एकूण ४९ मते मिळाल्याने पीठासीन अधिकाºयांनी त्यांना विजयी घोषित केले. व्हिडीओ चित्रीकरणात ही मतदानाची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत नगरसचिव मदन तांबेकर यांच्यासह गणक भूषण पुसदकर, श्रीकांत चव्हाण व नंदकिशोर पवार आदींचे सहकार्य लाभले.

उपमहापौरपदावरून महाशिवआघाडीचे त्रांगडे
राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेतदेखील महाशिवआघाडीसाठी विरोधी पक्षनेते बबलू शेखावत व माजी महापौर विलास इंगोले यांनी प्रयत्न केला. मात्र, शिवसेना, एमआयएम व बसपाद्वारा उपमहापौरपदाची मागणी करण्यात आली. यासाठी एकमत होत नसल्याने काँग्रेसने दोन्ही उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले. सेनेचे राजेंद्र तायडे यांनीदेखील उमेदवारी अर्ज मागे घेतला व एमआयएम व बसपा यांचे अर्ज कायम राहिले. यामध्ये एमआयएमला काँगेसने सहकार्य केले, तर बसपा स्वतंत्र राहिली.

बंडोबा थंडावले
चार दिवस महापौरपदावरून भाजपच्या नगरसेवकांमध्ये तणातणी झाली. संघटनात्मक बैठकीत महापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांसोबत अन्य सदस्यांनीसुद्धा उपस्थित राष्ट्रीय व प्रदेश संघटनमंत्री पक्षाचे शहराध्यक्ष कोअर कमिटी सदस्य, आमदार, माजी आमदारांसमक्ष चांगलीच खरडपट्टी काढली. एकंदरित वातावरण टेन्स असताना गटनेत्यांनी व्हीज बजावला. यालाही न जुमानत बंडोबा जुमानले नाहीत. त्यामुळे महाशिवआघाडी चर्चेत आली. अखेर गुरुवारी रात्री बंड शमले अन् बंडोबा थंडावले.

तीन उमेदवार अनुपस्थित
या निवडणूक प्रक्रियेत ७७ नगरसेवक सहभागी झाले. ७ तटस्त राहिले. महापौराच्या निवडणूक प्रक्रियेत अपक्ष दिनेश बूब, एमआयएमच्या नझमुन्नीसा सय्यद महमूद व एमआयएमच्या रुबीना तब्बसूम हारूण अली तसेच उपमहापौराच्या निवडणूक प्रक्रियेत दिनेश बूब, नझमुन्नीसा सय्यद महमूद व काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार हे अनुपस्थित राहिले. शेख जब्बार हे केवळ महापौरपदाच्या मतदानालाच उपस्थित होते.
 

Web Title: Chetan Gawande Mayor, Kusum Sahu Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.