छत्रपती संघटनेने जपले सामाजिक दायित्व

By admin | Published: March 29, 2016 12:05 AM2016-03-29T00:05:29+5:302016-03-29T00:05:29+5:30

कुटुंब प्रमुखाच अवेळी जाण्याने जगाव कसं, अशी घालमेल असतानाच त्यांना जगण्याची नवी उमेद मिळावी ...

The Chhatrapati Sangya Sanghatna has ensured social responsibility | छत्रपती संघटनेने जपले सामाजिक दायित्व

छत्रपती संघटनेने जपले सामाजिक दायित्व

Next

तिवसा : कुटुंब प्रमुखाच अवेळी जाण्याने जगाव कसं, अशी घालमेल असतानाच त्यांना जगण्याची नवी उमेद मिळावी या सामाजिक दायित्वातूनच शिव जयंतीच्या पर्वावर आमदार यशोमती ठाकूर मित्रमंडळ व छत्रपती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंतीच्या सोहळ्यात बळीराजांच्या निराधार कुटुंबीयांना उदर निर्वाहाकरिता शिलाई मशीनचे व साडीचोळशीचे वाटप करण्यात आले.
शिवजयंती कार्यक्रम म्हणजे शोभायात्रा, घोषणा, जल्लोष अशीच धारणा सर्वांची झाली आहे. मात्र तिवसा येथे शिवजयंतीच्या पर्वावर नुकत्याच पा रपडलेल्या हा भावनिक कार्यक्रम मात्र सामाजिक संदेश देऊन गेला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, उद्घाटिका आमदार यशोमती ठाकूर, नगर पंचायत अध्यक्ष राजकन्या खाकसे, उपाध्यक्ष वैभव स. वानखडे, सिने अभिनेता कमलाकर सातपुते, अभिनेता योगेश सुपेकर, शिवव्याख्याते अविनाश धायफुळे पाटील, सुरेशराव साबळे, मुकुंदराव देशमुख, दिलीप काळबांडे, संजय देशमुख, नगर पंचायतचे नगरसेवक, पंचायत समिति सदस्य, सहकार क्षेत्रातील गणमान्य आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी शिवचरित्र व्याख्याते अविनाश धायगुडे पाटिल यांनी, आजच्या युवक शेतकरी व समाज कसा असायला हवा यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
शेतकरी आत्महत्याग्रस्त ९ कुटूंबाना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या मध्ये भिवापूर येथील वर्षा जीवन राठोड, केशर चव्हाण, शोभा देवीदास तायडे (अहमदाबाद), उज्ज्वला गोपाल डाहे (दुर्गवाडा), वंदना रमेशराव शेंडे (वाठोडा), प्रतिभा राजेंद्र ढबाले (वाठोडा), ताई शेषराव चव्हाण (भिवापुर, स्वाती अरुणराव ठाकरे (डेहणी) यांचा समावेश होता.
यावेळी अपंगांना सायकलीचे वाटप करण्यात आले. सोबतच प्रतिकूल परिस्थितितही स्वबळावर उत्तम शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकरी नारायणराव ढांगे (मार्डा), राजेश थोरात (तलेगांव ठाकूर) यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक तिवसा न.प. चे उपाध्यक्ष वैभव वानखडे, संचालन ज्ञानेश्वर घटकर व आभार प्रदर्शन वैभव काकडे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: The Chhatrapati Sangya Sanghatna has ensured social responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.