छत्री तलाव ठरतोय पक्ष्यांची पंढरी...!

By Admin | Published: December 5, 2015 12:18 AM2015-12-05T00:18:39+5:302015-12-05T00:18:39+5:30

अंबानगरीचे वनवैभव असलेल्या छत्री तलावावर आजपर्यंत २१४ पक्ष्यांची नोंद पक्षिमित्रांनी केली आहे. त्यात दुर्मिळ व स्थंलातरित पक्षीही आढळले आहेत.

Chhatri lake is the bird's colorful ...! | छत्री तलाव ठरतोय पक्ष्यांची पंढरी...!

छत्री तलाव ठरतोय पक्ष्यांची पंढरी...!

googlenewsNext

२१४ पक्ष्यांची नोंद : दुर्मिळ, स्थलांतरित पक्षीही आढळले
अमरावती : अंबानगरीचे वनवैभव असलेल्या छत्री तलावावर आजपर्यंत २१४ पक्ष्यांची नोंद पक्षिमित्रांनी केली आहे. त्यात दुर्मिळ व स्थंलातरित पक्षीही आढळले आहेत. छत्री तलाव जणू पक्ष्यांची पंढरीच बनली आहे.
शहराची प्राचीन ओळख असणारे छत्री तलाव, वडाळी तलाव व पोहरा मालखेडचे जंगल हा भाग पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे पंढरीच्या देवस्थानात भाविकाचा लोंढा असतो, त्याचप्रमाणे पक्ष्यांचे थवेच्या थवे तलावावर येत आहेत. पूर्वी हा तलाव अमरावती शहराची तहान भागवायचा. मात्र काळाच्या ओघात छत्री तलावाची ही ओळख स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे होत आहे. वन्यजीव अभ्यासक यादव तरटे हे १५ वर्षांपासून पक्षिनिरीक्षणाचे कार्य करीत आहेत. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणात तब्बल ६४ प्रकारचे स्थलांतरित पक्षी येथे दरवर्षी हजेरी लावतात. छत्री तलाव परिसरात एकूण ८५ प्रकारचे पाणपक्षी व १२९ प्रकारचे रानपक्षी पक्षी आढळले आहेत. निसर्ग लेखक प्रदीप हिरुरकर, वैभव दलाल, मनोज बिंड, कृष्णा खान, धनंजय भांबूरकर, सुरेश खांडेकर, अमित ओगले, राहुल गुप्ता, सचिन सरोदे, सचिन थोते, शशी ठवळी, प्रफुल्ल गावंडे पाटील व क्रांती रोकडे यांचे यासाठी सहकार्य लाभले.
संकटग्रस्त नऊ पक्ष्यांची नोंद
आययूसीएनच्या यादीत असलेला काळ्या पोटाचा सुरय या अतिदुर्मिळ स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन महत्त्वाचे आहे. यातील काळ्या शेपटीचा पाणटिवळा, नदी सुरय, काळ्या डोक्याचा अवाक, करोता, मोठा गिजरा, चिमण शेंद्या, कामरा ढोक असे एकूण नऊ संकटग्रस्त पक्ष्यांची नोंद आहे.
प्रदूषणाचा विळखा
अलीकडच्या काळातील प्रदूषणामुळे पक्षी जीवनाला ग्रहण लागले आहे. अमरावती शहर फुगत चालले आहे. आता नवनवीन प्रकल्प येऊ घातले आहेत. आधीच निर्माल्य व प्लास्टिकमुळे येथील प्रदूषण वाढलेले आहे.
सावजीचे कार्य मोलाचे
छत्री तलाव परिसरातील स्वच्छतेसाठी अविनाश सावजी यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहे. स्वच्छतेची कास धरणारे सावजी यांनी व त्यांच्या सहकार्यांनी छत्री तलाव स्वच्छ करून मोलाचा वाटा उचलला आहे.

Web Title: Chhatri lake is the bird's colorful ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.