मुख्य निवडणूक निरीक्षक पाठक यांनी घेतला आढावा
By admin | Published: February 9, 2017 12:06 AM2017-02-09T00:06:36+5:302017-02-09T00:06:36+5:30
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तथा महापालिकेचे मुख्य निवडणूक निरीक्षक महेश पाठक यांनी महापालिकेच्या निवडणूक कामकाजाचा बुधवारी आढावा घेतला.
अमरावती : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तथा महापालिकेचे मुख्य निवडणूक निरीक्षक महेश पाठक यांनी महापालिकेच्या निवडणूक कामकाजाचा बुधवारी आढावा घेतला. आयुक्त हेमंत पवार यांनी महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ बाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. मुख्य निवडणूक निरीक्षक महेश पाठक यांनी अमरावती महापालिका सार्वत्रिक निवडणुकीबाबतीत संपूर्ण कामकाज सुरळीत व व्यवस्थितरित्या पार पाडावे. काही सूचना असल्यास पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांचेशी संपर्क साधावा. यावेळी राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली. राजकीय पक्षांच्या सदस्यांसोबत विविध मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या आढावा बैठकीला निवडणूक निरीक्षक रवींद्र ठाकरे, माधव कुसेकर, सतीश भर्तन, आर.ए. बोबडे, उपायुक्त विनायक औगड, नरेंद्र वानखडे, निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. के. खिल्लारे, पी. एम. कापडे, गौतम वालदे, जी.जी. मावळे, डी.आर. खाडे, राजेंद्र भुयार आदी उपस्थित होते.